‘एमएमआरडीए’च्या दोन अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा

तपासणीत दीड लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंतरी एक लाख २० हजार रुपये स्वीकारण्यास आरोपींनी कबूल केले

मुंबई : सहार उन्नत मार्गाच्या विस्तारीकरणासाठी झोपडी तोडण्यात आल्यामुळे त्या बदल्यात दीड लाखांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) दोन अधिकाऱ्यांसह तिघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. तक्रारदाराची विलेपार्ले पूर्व येथे झोपडी होती. उन्नत मार्गाच्या विस्तारीकरणासाठी ती झोपडी तोडण्यात आली. त्या बदल्यात तक्रारदार यांना कुर्ला पश्चिम येथे सदनिका मिळाली. सदनिकेचे वितरण पत्र देण्यासाठी आरोपी सहाय्यक समाज विकास अधिकारी शहाजी जोशी व उपजिल्हाधिकारी संगिता टकले यांनी दीड लाखांची लाच मागितली, असा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. तपासणीत दीड लाख रुपयांची मागणी करून तडजोडी अंतरी एक लाख २० हजार रुपये स्वीकारण्यास आरोपींनी कबूल केले. त्यानुसार गुरुवारी एसीबीने सापळा रचला असता आरोपींच्या वतीने खासगी व्यक्ती जगदीश पाटील यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Acb filed bribery case against mmrda officials zws