scorecardresearch

मुंबई : माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप

भोईर यांनी उत्पन्नापेक्षा ४४९ टक्के अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसीबीने शोध मोहिमही राबवली.

crime
दोन मित्रांत तुफान हाणामारी, मध्यस्थी करणाऱ्यांवर चाकुहल्ला; २ जणांचा मृत्यू तर…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याप्रकरणी  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. भोईर यांनी उत्पन्नापेक्षा ४४९ टक्के अधिक मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसीबीने शोध मोहिमही राबवली.

हेही वाचा >>> मुंबई : ताडदेवमधील अंध मुलांच्या शाळेत विषबाधा; सात मुले रुग्णालयात

उद्धव ठाकरे गटातील नेते व पदाधिकाऱ्यांविरोधात तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरूच असून आता एसीबीने योगेश भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. योगेश भोईर समता नगर प्रभाग २४ येथील माजी नगरसेवक आहेत. भोईर यांनी ८५ लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.  योगेश भोईर यांच्यावर ज्ञात मिळकतीच्या ४४९.१४ टक्के अपसंपदा जमवल्याचा आरोप आहे. नगरसेवक पदाच्या कालावधीमध्ये ज्ञात उत्पन्नापेक्षा  ८५ लाख ५६ हजार ५६२ रुपये अधिक मालमत्ता जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे भोईर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एसीबीने शोध मोहिमही राबवली.

हेही वाचा >>> पुणे मंडळाची आजची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वी डिसेंबर, २०२० मध्ये भोईर यांच्याविरोधात खंडणीसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. याप्रकरणातील सहआरोपी गणेश ठाकूर आणि दिनेश ठाकूर या दोन बंधूंकडून देवाराम दर्गाराम चौधरी यांनी तीन टक्के सावकारी व्याजाने २२ लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. २०१५ पर्यंत त्यांनी व्याजासहीत २४ लाख ६५ हजार रुपये त्यांना परत केले होते. मात्र ही रक्कम देऊन ते दोघेही त्यांच्याकडे दहा टक्के व्याजदाराने आणखी पैशांची मागणी करीत होते. याचदरम्यान त्यांना ठाकूर यांच्या वतीने योगेश भोईर यांनी साडेसात लाख रुपये परत करण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 16:08 IST
ताज्या बातम्या