मुंबई : मुसळधार पाऊस पडल्यानंतर रेल्वे सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडू नये यासाठी पालिकेने रेल्वे प्रशासनाबरोबर समन्वय साधून युद्धपातळीवर रेल्वेच्या हद्दीत नालेसफाई, मोऱ्यांची (कल्व्हर्ट) सफाई हाती घेतली आहे. त्याचबरोबर पूर्व उपनगरांमधील मध्य आणि हार्बर मार्गावर पावसाचे पाणी साचू नये म्हणून सुमारे २८ ठिकाणी साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वेच्या हद्दीतील विविध पावसाळापूर्व कामे पार पाडण्यासाठी यंदाही पालिकेने मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनासमवेत रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळय़ा नाल्यांमधील गाळ उपसण्यासह मोऱ्यांच्या स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. या कामांना वेग देण्यासह विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविणे, आवश्यक तेथे वृक्ष छाटणी करणे आदी कामे करण्यात येत आहेत. या सर्व कामांसंदर्भात आढावा घेण्यासाठी पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या दालनात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ही सर्व कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे व या सर्व कामांची पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी व समन्वय अधिकारी उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accelerate pre monsoon cleaning pumps installed places central harbor railway line water release ysh
First published on: 18-05-2022 at 00:02 IST