बसखाली एकाला चिरडले

पनवेल एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलाखाली उभ्या केलेल्या दुर्गा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसगाडीने एकाला चिरडले.

पनवेल एसटी डेपोसमोरील उड्डाणपुलाखाली उभ्या केलेल्या दुर्गा ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसगाडीने एकाला चिरडले. मृताचे नाव नाना रामदास पाटील असे आहे. पाटील हे याच दुर्गा ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये मदतनीसाचे काम करीत होते.
 बसचे चालक सुरेश पाटील  यांनी दुरुस्तीसाठी ही बस उड्डाणपुलाखाली उभी केली होती. दुरूस्तीचे काम झाल्यानंतर मदतनीस नाना पाटील गाडीखाली झोपले होते, असे नाना यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Accident news