लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रयोगशाळेला राष्ट्रीय परीक्षण आणि अंश परीक्षण प्रयोगशाळा अधिस्विकृती मंडळाकडून (एनएबीएल) शुक्रवारी मानांकन प्राप्त झाले आहे. परिणामी, पालिकेच्या प्रयोगशाळेत पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेवर आता शिक्कामोर्तब होणार आहे.

Bhushan Gagranis order to the officials to make no mistakes in the work of the upcoming assembly elections
आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामात कसूर नको, भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Elderly woman commits suicide in Mulund
मुंबई : मुलुंडमध्ये वृद्ध महिलेची आत्महत्या
maharashtra government to grant rs 1600 crore to cotton and soybean farmers
कापूस, सोयाबीन उत्पादकांना १६०० कोटींची मदत
ex finance minister of j and k haseeb drabu on Article 370
अनुच्छेद ३७० रद्द करून कोणी, काय मिळवले? जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचा सवाल
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण

मुंबई महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागाची प्रयोगशाळा १९३५ सालपासून कार्यरत आहे. प्रयोगशाळेसाठी आवश्यक तांत्रिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. तसेच, प्रयोगशाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत पद्धतीचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरणीय समतोल राखण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या अनेक प्रयत्नांपैकी मलनिःसारण प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण करण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून सुविधा अद्ययावत करून या प्रयोगशाळेला मानांकन मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. महानगरपालिका क्षेत्रात मलनिःसारण व्यवस्थेमध्ये अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सुधारणा व्हाव्या, यादृष्टीने करण्यात आलेल्या प्रयत्नांना मिळालेल्या यशापैकी एक एनएबीएल मानांकन ठरले आहे.

आणखी वाचा-वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश सुट्टीच्या दिवशीही होणार

मुंबईतील मलनिःसारण व्यवस्थेची विभागणी कुलाबा, वांद्रे, वरळी, मालाड, भांडुप, घाटकोपर अशी करण्यात आली आहे. मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी प्रक्रिया करण्यात आलेले पाणी समुद्रात सोडण्याआधी या प्रकल्पाच्या ठिकाणी शुद्ध केले जाते. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्यानासाठी, तसेच शौचालयाच्या वापरासाठी करणे शक्य असते . त्यासाठी महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागाच्या प्रयोगशाळेत तब्बल २२ निकषांवर आधारित पाण्याची चाचणी होते. पुनर्प्रक्रिया झालेले पाणी समुद्रात न सोडता पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी करणे, हे चाचणी करण्याचे उद्दिष्ट आहे. गुणवत्तापूर्ण पाणी पुनर्वापरासाठी मिळणे हा चाचणीचा उद्देश आहे. मुंबईतील खासगी मलनिःसारण प्रक्रिया प्रकल्प चालकांनाही या प्रयोगशाळेतून पाणी तपासणी करणे शक्य आहे. महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेला मानांकन मिळाल्याने अशा चाचण्यांच्या संख्येत निश्चितच वाढ होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-एसईबीसी व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदतवाढ

एनएबीएल मानांकन प्राप्त झाल्यामुळे आता महानगरपालिकेच्या मलनिःसारण प्रयोगशाळेचा अहवाल फक्त भारतातच नव्हे तर, जागतिक पातळीवर विश्वासार्ह ठरणार आहे. मलनिःसारण प्रक्रिया केलेल्या पाण्याची तपासणी महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत अधिकाधिक होवून पर्यायाने महसूल वाढीसाठी देखील फायदा होणार आहे, असे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी व्यक्त केले.