Accused arrested for abusing a one year old girl in Mumbai mumbai print news ssb 93 | Loksatta

मुंबई : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

याप्रकारणी मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली होती.

Accused arrested abusing girl Mumbai
सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक (प्रातिनिधिक छायाचित्र)

सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला मानखुर्द पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. याप्रकारणी मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – “…हे तर थेट नरेंद्र मोदी व अमित शाह यांनाच आव्हान”, संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले…

हेही वाचा – मुंबईत भाजपची मदार मोदींवरच

पीडित मुलगी आरोपीच्या इमारतीत राहते. मुलगी घराबाहेर असताना आरोपीने तिला उचलून घरात नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकारामुळे घाबरलेली मुलगी रडायला लागली. त्यामुळे घाबरून आरोपीने तिला घराबाहेर सोडले. त्यानंतर पीडित मुलीने घरी जाऊन हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानुसार त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला रविवारी रात्री उशिरा अटक केली. घटना घडली, त्यावेळी आरोपीची आई व भाऊ रुग्णालयात गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नसल्याचा फायदा उचलून आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:09 IST
Next Story
मुंबई: मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडप्रकरणी उद्यापासून सुनावणी