घरफोडीचे २० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला वांद्रे टर्मिनस परिसरातून अटक करण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे. आरोपीकडून ९ तोळे सोने हस्तगत करण्यात आले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा- बेवारस वाहने हटवण्याची मोहीम थंडावली ; विल्हेवाटीसाठी योग्य जागेचा मुंबई पालिकेकडून शोध

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हददीत राहणाऱ्या वृशाली गणेश जोशी (३१) यांच्या घरात फेब्रुवारी महिन्यात चोरी झाली होती. आरोपीने दराचा कडीकोयंडा कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील सुमारे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागीने चोरले होते. याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. साकीनाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नागरे अमलदार यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरूवात केली. त्यावेळी या चोरीमागे सराईत गुन्हेगार करामत अली दोस्त अली शेख याचा सहभाग असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे शेख याचा शोध घेत असताना तो मागील ६ महिन्यांपासून अहमदाबाद, गुजरात येथील दाणी लिमडा येथे राहत असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत होते.

हेही वाचा- म्हाडाचे ३९ पुनर्विकास प्रकल्प ठप्प ; रहिवाशांच्या पुढाकाराबाबत कायदेशीर चाचपणी सुरू

नुकतेच आरोपी गुजरातहून धारावी येथे आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये वास्तव्याला असल्यामुळे पोलिसांनी परवानगी घेऊन गुजरामध्ये त्याच्या ठिकाणावर जाऊन तपासणी केली. तेथे ९ तोळे सोने सापडले. आरोपीविरोधात २० हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.