कांदिवली येथे बेस्ट बस अडवून चालकाला मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वाराला चारकोप पोलिसांनी अटक केली. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे व चालकाला मारहाण केल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.नालासोपारा येथे वास्तव्यास असलेले भावेश पवार (३२) बेस्ट उपक्रमात बसचालक म्हणून कामाला आहेत. कांदिवली रेल्वे स्थानक -चारकोपदरम्यानच्या मार्गिकेवर ते बस चालवितात. नेहमी प्रमाणे बसने मीलन जंक्शन चौक येथून जात असताना एका दुचाकीस्वाराने बससमोर दुचाकी उभी केली. त्यामुळे पवार यांनी बस थांबवली असता त्या तरूणाने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने दरवाजा उघडून भावेश यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

हेही वाचा >>>मुंबई: ‘मेट्रो २ ब’च्या मंडाळे कारशेडचे ५४ टक्के काम पूर्ण; २०२५ मध्ये मार्गिका सेवेत

Gang demanding extortion from municipal contractor arrested
महापालिकेच्या कंत्राटदाराकडून खंडणी उकळणारी टोळी अटकेत
bogus police
‘त्या’ बोगस पोलिसाला बॅच कोणती ते सांगता आले नाही 
youth was kidnapped
खळबळजनक..! मृतदेहाची इन्स्टाला स्टोरी (स्टेटस) ठेवली; ‘त्या’ तरुणाची अपहरण करून केली हत्या
Gokhale Bridge
गोखले पुलाचे ढिसाळ नियोजन, निवृत्त अधिकाऱ्याला पालिकेच्या पायघड्या

बसमधून त्याने खाली खेचले असता त्याचा गणवेशही फाटला. त्यावेळी तेथून जाणाऱ्या पोलिसांनीही दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकीस्वाराने पोलिसालाही धमकावले. तसेच त्यांची कॉलरही पकडली. या प्रकारानंतर नागरिकांनी तरुणाला पकडले आणि चारकोप पोलीस ठाण्यात नेले. तेथे पवार यांनी केलेल्या तक्रारीनंतर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी तरूणाला अटक केली.