मुंबई : सणासुदीच्या काळात मिठाई आणि तत्सम अन्नपदार्थाच्या मागणीत होत असलेली वाढ लक्षात घेऊन त्यात भेसळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पदार्थांची खातरजमा करून सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी गणेशोत्सवादरम्यान अन्न व औषध प्रशासन मुंबई विभाग व ठाणे कार्यालयाने एकत्रितरित्या विशेष मोहीम राबवली. या मोहिमअंतर्गत मुंबई विभागात एकूण ६० तपासण्या करण्यात आल्या व एकूण ७६ अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत.

सणासुदीच्या काळात खाद्यतेल, मिरची पावडर व दूध या अन्नपदार्थावर अन्न व औषध प्रशासनाने जप्तीची कारवाई केली. मिरची पावडरच्या वेष्टनावर कोणत्याही प्रकारचा मजकूर न छापल्याने किंवा लेबल न लावल्याने ७४८ किलो वजनाचा आणि २ लाख ८४ हजार २४० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. तसेच कमी दर्जाचे आणि बनावट लेबल असलेले ७४४ किलोचे १ लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचे रिफाईंड सूर्यफुल तेल जप्त करण्यात आले. मालाड पूर्व येथे दोन ठिकाणी धाडी टाकून विविध कंपन्याच्या पिशवीबंद दुधाचा १७ हजार २८ रुपये किमतीचा एकूण २८५ लिटर साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. या सर्व खाद्यपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

drones, girgaon chowpatty, missing children girgaon,
गिरगाव चौपाटीवर ड्रोन उडवणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा, हरवलेली ३९ मुले कुटुंबियांकडे सुपूर्द
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
cattle sheds, Aare Colony, Milk Producers Association,
तबेल्यांच्या स्थलांतरास विरोध, आरे वसाहतीमध्ये जागा देण्याची दूध उत्पादक संघटनेची मागणी
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!

हेही वाचा – दसरा मेळावासाठी केवळ ठाकरे गटाकडून अर्ज, अद्याप परवानगी नाही

हेही वाचा – आमची दैना… असुविधांचा लोको पायलटना फटका, २०४ लोको कॅबमध्ये स्वच्छतागृह नाही

बृहन्मुंबई विभागात सद्यः स्थितीत तुटपुंजे मनुष्यबळ असतानाही ठाणे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली. जनतेस सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई विभागाचे सहआयुक्त (अन्न) म. ना. चौधरी यांनी दिली.