समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कारवाई – गृहमंत्री

निवेदन देण्यासाठी जात असताना काही लोकांनी दगडफेक करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

dilip-Walse-patil
(Photo- Twitter)

 मुंबई : अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून दोन समाजात द्वेष पसरविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई के ली जाईल. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधी पक्षांनाही सहकार्याचे आवाहन के ल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी  दिली.

अमरावतीमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी राज्यातील जनतेला  शांतता ठेवण्याचे आवाहन के ले आहे. त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्यासंदर्भात राज्यात शुक्रवारी काही संघटनांनी निवेदन देण्याची परवानगी मागितली होती.

निवेदन देण्यासाठी जात असताना काही लोकांनी दगडफेक करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपने अमरावती बंदची हाक दिली होती. या बंदमध्ये शांततेने मोर्चा होईल, अशी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने त्यामध्ये काही घटना घडल्या आहेत.  परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action against those who spread hatred in the society home minister dilip walse patil akp

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या