मुंबई : मुंबई महानगरपालिकेने गेल्या आठवड्यापासून मुंबईतील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईअंतर्गत गेल्या आठवड्याभरात फेरीवाल्यांच्या गाड्या व अन्य सामान जप्त करण्यात आले आहे. त्यात ७१३ चारचाकी हातगाड्या, १ हजार ०३७ स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर आणि १ हजार २४६ इतर विविध प्रकारच्या साहित्याचा समावेश आहे. ‘फेरीवालामुक्त परिसर’ मोहिमेअंतर्गत १८ ते २४ जून २०२४ दरम्यान विविध विभागांत अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली.

मुंबईकर नागरिकांना पदपथ आणि रस्त्यांचा वापर करताना अडथळा ठरणाऱ्या, तसेच आरोग्यासाठी अपायकारक अशा पद्धतीने उघड्यावर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेमार्फत सातत्याने कारवाई करण्यात येते. मुंबई महानगरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाईविषयी समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन आणि मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक महानगरपालिका मुख्यालयातील महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात गुरुवारी सायंकाळी पार पडली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे आदींवर कठोर कारवाई करावी; मुंबई अनधिकृत फेरीवालेमुक्त करावी, पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करावेत, असे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले. त्यानुसार, अतिक्रमण निर्मूलन कारवाईला अधिक वेग देण्यात येत आहे.

municipal administration started temporary repairs on ghodbandar flyover and inspection of roads
ठाणे : कोंडीनंतर अधिकाऱ्यांना जाग, उड्डाणपुलांलगत तात्पुरती दुरूस्ती, रस्त्यांच्या पाहाणीला सुरूवात
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
e vehicle prices will remain under control even without subsidy says nitin gadkari
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी
kalyan ganeshotsav 2024
कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान, जलप्रदूषण रोखण्यासाठी कडोंमपाचा उपक्रम
cyber crime, Courier Scam, cyber criminals,
सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार.. काय आहे ‘कुरिअर स्कॅम’?
car market india
हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?
kondhwa md drugs
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई; कोंढव्यातून ४० लाखांचे मेफेड्रोन, पिस्तूल जप्त
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण

हेही वाचा >>>फाशीची शिक्षा झालेल्या तरुणाच्या वर्तनाबाबतचा अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश

मुंबईतील विविध विभागांमध्ये गेल्या आठवडाभरात झालेल्या कारवाईत चारचाकी हातगाड्या, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, स्टोव्ह, शेगडी, बाकडे, शॉरमा यंत्र आदी जप्त करण्यात आले. मुंबईतील नागरिकांना पदपथ सहजपणे वापरता यावेत, तसेच रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पदपथ अतिक्रमण मुक्त राहतील, या अनुषंगाने उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केल्या आहेत. मुंबईतील पदपथ नागरिकांना वापरासाठी नियमितपणे उपलब्ध रहावेत, तसेच आरोग्याच्या दृष्टीने दर्जेदार अन्न मुंबईकरांना मिळावे, उघड्यावर व अस्वच्छ रितीने अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर वचक रहावा, यासाठी सातत्याने ही मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी दिली.

या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेली साधनसामग्री

जप्त साधनांची एकूण संख्या – २,९९६

१) चारचाकी हातगाड्या – ७१३

२) सिलिंडर – १,०३७

३) स्टोव्ह, शेगडी, तवा, कढई, भांडी, लोखंडी बाकडे इत्यादी विविध प्रकारचे साहित्य – १,२४६