मुंबई : बेनामी मालमत्ताप्रकरणी राज्याचे माजी मुख्य सचिव आणि महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांच्या दक्षिण मुंबईतील सदनिकेवर प्राप्तिकर विभागाने टांच आणली आहे. या कारवाईमुळे मेहता यांना या घराचा कोणताही व्यवहार परस्पर करता येणार नाही.

अजोय मेहता यांनी मंत्रालयासमोरील समता इमारतीत केलेली घरखरेदी ही वादात सापडली होती. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कंपनीचा त्या मालमत्तेशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्यातूनच प्राप्तिकर विभागाने बेनामी मालमत्ताप्रकरणी चौकशी के ली होती. मूळ १० कोटी किमतीची हा सदनिका पाच कोटीला खरेदी केल्याची नोंदणी करण्यात आली होती. प्राप्तिकर विभागाने या घरखरेदीबाबत काही महिन्यांपूर्वी अजोय मेहता यांना नोटीस बजावली होती. त्या वेळी सर्व कायदेशीर प्रक्रि येचे पालन करूनच घर घेतल्याचे आणि त्यावरील मुद्रांक शुल्कही योग्य दराने भरल्याचा दावा मेहता यांनी के ला होता. त्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने मेहता यांच्या या मालमत्तेवर टांच आणली (अ‍ॅटॅच) आहे. त्यानुसार प्राप्तिकर विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवत या मालमत्तेचे खरेदी-विक्री व्यवहार परस्पर करू नये, असे स्पष्ट के ले आहे.

माझ्या ३५ वर्षांच्या सेवेतील उत्पन्नातून के लेल्या बचतीमधून ही सदनिका खरेदी के ली आहे. त्याबाबतचे तपशील उपलब्ध आहेत. बाजारदरापेक्षा अधिक दराने ही खरेदी के ली आहे. मी त्या सदनिके तच कु टुंबासह राहत आहे. – अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा