विलेपार्ले पश्चिम येथील गोल्डन टोबॅको कंपनीच्या आवारातील मोकळ्या भूखंडावर भले मोठे स्टुडिओ उभारण्याचा घोटाळा मान्य करीत महापालिकेने अखेर कारवाई करीत बेकायदा स्टुडिओंचे बांधकाम पाडून टाकले.आठ एकरवर पसरलेल्या गोल्डन टोबॅको कंपनीच्या प्रवेशद्वारावर गुजरातमधील न्यायालयाचा प्रवेश बंदीचा आदेश आहे. मात्र तो झुगारून येथे मोठ्या प्रमाणात स्टुडिओ उभारण्यात आले होते. हे सर्व स्टुडिओ एकमेकांना खेटून असून आगीसारखी घटना घडली तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याबाबत `वॉच डॉग फौंडेशनʼचे गॉडफ्रे पिमेंटा, निकोलस अल्मेडा, ॲड. व्हिव्हिअन डिसोझा, रीता डिसोझा, टुलीप मिरांडा यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त दिले होते. त्यानंतर या स्टुडिओंवर वरदेखली कारवाई करण्यात आली. ही बाब उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या निदर्शनास आणून देता त्यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली व बेकायदा स्टुडिओ पाडण्याचे आदेश दिले. त्यानुसार परवानगी नसलेले स्टुडिओ पाडण्यात आले. परिणामी आता आगीसारख्या आणीबाणीच्या स्थितीतही लागली अग्निशमन दलाची गाडी जाऊ

हेही वाचा >>>मुंबई: अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा

employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Gang demanding extortion from municipal contractor arrested
महापालिकेच्या कंत्राटदाराकडून खंडणी उकळणारी टोळी अटकेत
bogus police
‘त्या’ बोगस पोलिसाला बॅच कोणती ते सांगता आले नाही 

मदतीला शकणार आहे. याआधी हे स्टुडिओ खेटून उभारण्यात आले होते. हे स्टुडिओ उभारण्यासाठी अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले असले तरी त्यातील अटींचे पालन केले आहे किंवा नाही हे तपासावे लागेल, असे अंधेरी अग्शिशमन केंद्रातील अधिकारी के. डब्ल्यू. डुंडगेकर यांनी सांगितले होते. तात्पुरत्या शेडच्या नावाखाली येथे भले मोठे स्टुडिओ उभारण्यात आले होते. तरीही अग्निशमन अधिकारी अटींचे पालन केले आहे किंवा नाही याची तपासणी करण्यास टाळाटाळ करीत होते, हे स्पष्ट झाले आहे. अखेरीस उपायुक्त शंकरवार यांनी पुढाकार घेऊन अखेर ही कारवाई केली.

हेही वाचा >>>मुंबई : पाच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

मोकळ्या भूखंडावर कुठलेही बांधकाम करण्यासाठी पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र या ठिकाणी पालिकेच्या के पश्चिम विभागाने शेड उभारण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली. या तात्पुरत्या परवानगीच्या जोरावर या ठिकाणी पक्के बांधकाम असलेले स्टुडिओ उभारण्यात आले होते. शेडमध्ये पक्के बांधकाम करता येत नाही. पण त्याकडे के पश्चिम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा रहिवाशांचा दावा आहे. शेड उभारण्यात आल्या असून पक्के बांधकाम करण्यात आलेले नाही, असा दावा उपायुक्त शंकरवार यांनी केला आहे.