‘सुवर्णलाभ’मधील दुकानांच्या भेटीला अलका कुबल

मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री ते एकटीने मराठी चित्रपट गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलेली चित्रपट निर्माती असा खूप मोठा पल्ला अलका कुबल यांनी गाठला आहे.

विलेपार्लेतील दुकानांत आज ग्राहकांशी गप्पा

मुंबई : सोने खरेदीवर बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’तील सहभागी दोन ज्वेलरी दुकानांना शनिवारी अभिनेत्री अलका कुबल भेट देणार आहेत. दिवाळी तोंडावर आलेली असताना सोन्याच्या खरेदीलाही उधाण आले आहे. सोन्याच्या खरेदीवर बक्षिसे जिंकण्याची संधी देत खरेदीचा आनंद द्विगुणित करणारी ही योजना आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांच्या खरेदीचा उत्साह आणखी वाढवण्यासाठी अलका कुबल यांची ही भेट खास ठरणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री ते एकटीने मराठी चित्रपट गावखेड्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलेली चित्रपट निर्माती असा खूप मोठा पल्ला अलका कुबल यांनी गाठला आहे. चित्रपट असो वा मालिका निर्मितीची गणिते लीलया सोडवणाऱ्या या अभिनेत्रीच्या भेटीचा आनंद ग्राहकांना ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’च्या माध्यमातून घेता येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सहप्रायोजित ‘लोकसत्ता  सुवर्णलाभ योजने’चे ग्राहकांनी  खूप उत्साहात स्वागत केले  आहे.

२७ ऑक्टोबरपासून सुरू झालेला सुवर्णखरेदीचा हा उत्सव ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेंतर्गत सहभागी झालेल्या विलेपार्ले येथील वाकडकर ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर (जानकी ज्वेलर्स) या दोन ठिकाणी शनिवारी, ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११च्या सुमारास

अलका कुबल भेट देणार

आहेत. सोने खरेदीबरोबरच अलका कु बल यांच्या भेटीचा योगही या योजनेच्या माध्यमातून जुळून आला आहे.

अगदी एक ग्रॅमच्या सोनेखरेदीपासून ते आकर्षक ज्वेलरीपर्यंत कोणत्याही खरेदीवर बक्षिसे जिंकण्याची अनोखी संधी देणाऱ्या ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’ला धुमधडाक्यात सुरुवात झाली असून तुम्हालाही हा आनंद अनुभवायचा असेल तर लवकरात लवकर या योजनेत सहभागी असलेल्या सराफांना भेट द्या आणि सोने खरेदी करा.

  सहभाग कसा घ्याल?

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना एका बिलावर एक प्रवेशिका दिली जाईल. ही प्रवेशिका पूर्ण भरून तेथील ड्रॉप बॉक्समध्ये टाकावी लागेल.

या योजनेच्या शेवटच्या दिवशी सर्व दुकानांमधून प्रवेशिका जमा केल्या जाणार आहेत. या सर्व प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. विजेत्यांना एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

प्रायोजक 

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे सहप्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू आणि एम. के. घारे ज्वेलर्स. गोल्ड पार्टनर- श्री नेमिनाथ ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कं पनी, तर सिल्व्हर पार्टनर वाकडकर ज्वेलर्स आणि चिंतामणीज् ज्वेलर्स हे आहेत. तसेच आय केअर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय हे असून उषा एजन्सी गिफ्ट पार्टनर आहेत.

कुठे?

सी. ए. पेंडुरकर (जानकी ज्वेलर्स), ११ कामदार शॉपिंग सेंटर, रेल्वे स्थानकाजवळ,  विलेपार्ले (पूर्व)

वाकडकर ज्वेलर्स, भिडे बंगला, महात्मा गांधी रोड, विलेपार्ले (पूर्व)

सकाळी ११.०० वाजता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor alka kubal visiting the shops in suvarnalabh akp

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या