‘फू बाई फू’फेम अभिनेते संतोष मयेकर यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संतोष आजारी होते. आज (मंगळवारी) संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

नाटाकांसह संतोष यांनी मराठी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली होती. ‘फू बाई फू’ या कार्यक्रमात त्यांनी आपल्या धमाल विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २००६ मध्ये देवाशपथ खोटे सांगेन या मराठी चित्रपटाद्वारे संतोषने मराठी चित्रपटामंध्ये पदार्पण केले होते.

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

विविध मालिका आणि नाटकांमध्येही त्यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या होत्या. ‘भैय्या हातपाय पसरी’ , वस्त्रहरण, दोन बायका चावट ऐका आदी नाटक, मालिकेत त्यांनी काम केले. पण ‘भैय्या हातपाय पसरी’ या नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. अर्थ, दशक्रिया, इंडियन प्रेमाचा लफडा, एक तारा, गलगले निघाले, सातबारा कसा बदलला, सत्या सावित्री आणि सत्यवान सारख्या चित्रपटांमधून संतोष यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.