अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता केलं आहे. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला आहे. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं.. असं आता संजय राऊत यांनी म्हटलं आहे. कंगना रणौत नॉटी गर्ल आहे असं त्यांनी आता म्हटलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने तिला मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं म्हटलं होतं. त्यानंतर कंगना आणि संजय राऊत यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. ज्यानंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी तिच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान तिच्या या वक्तव्यावरुन संजय राऊतही चांगलेच संतापले. शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही तिच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला. संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं. आता संजय राऊत यांनी तिचा उल्लेख नॉटी गर्ल असा केला आहे.

हरामखोर बाबत काय म्हणाले संजय राऊत?
एखाद्या विषयाचं राजकारण करायचं असेल तर कुठल्याही शब्दाचा कुठलाही अर्थ निघू शकतो. महाराष्ट्रात आम्ही जेव्हा हरामखोर असं म्हणतो तेव्हा आम्ही त्याचा अर्थ खट्याळ आणि बेईमान असा होता. जी व्यक्त मुंबईत राहतो त्याबद्दल कुणी काही बोललं तर लोक असं म्हणतात त्याचा फार वेगळा अर्थ काढायची गरज नाही. जर कंगना रणौत कोलकाता, अहमदाबाद किंवा इतर कोणत्याही शहराबाबत असं बोलली असती तर त्या शहरांमधले लोक त्यांच्या भाषेत कंगनाला बोललेच असते तसंच मी बोललो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.