scorecardresearch

अभिनेत्रीवरील बलात्काराचा आरोप : गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेता आदित्य पांचोली उच्च न्यायालयात

बलात्काराच्या कथित आरोपप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेता आदित्य पांचोली याने उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अभिनेत्रीवरील बलात्काराचा आरोप : गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेता आदित्य पांचोली उच्च न्यायालयात
उच्च न्यायालय (संग्रहीत छायाचित्र)

मुंबई : बलात्काराच्या कथित आरोपप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेता आदित्य पांचोली याने उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पांचोली याच्यावर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी पांचोली याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर पांचोली याची याचिका मंगळवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना नोटीस बजावून याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच प्रकरणाची सुनावणी सप्टेंबर महिन्यात ठेवली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress rape allegation actor aditya pancholi high court seeking quashing case mumbai print news ysh