टॉलिवूड अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या यशोदा या तिच्या नव्या चित्रपटामुळे आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. समंथाचा ‘यशोदा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर चांगली कमाई केली आहे. ११ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी देशभरात ६.३२ कोटींची कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशीही ४ कोटींच्या पुढे टप्पा गाठला आहे. या चित्रपटाची दोन दिवसांची कमाई १० कोटींपेक्षा अधिक आहे.

दरम्यान, ‘यशोदा’ने प्रदर्शनापूर्वीच ५५ कोटींचा गल्ला जमवला होता. समांथाच्या कारकीर्दीतील हा प्रदर्शनाआधीच सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ट्रेड अभ्यासक रमेश बाला यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली होती. यशोदा’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी समांथाने सुमा कनकला यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिने सुमा यांच्याशी बोलताना “काही दिवस चांगले असतात, तर काही दिवस वाईट असतात. एखाद्या दिवशी मला काही करावसे वाटत नाही. तर कधीकधी मला इथंवर येण्यासाठी घेतलेली मेहनत, कष्ट आठवतात. काहीही झाले तरी शेवटी आपण जिंकतो हे मला ठाऊक आहे. मी आता लढायला तयार आहे”, असे वक्तव्य केले होते.

The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

हेही वाचा: मुंबई: आणखी एका प्रकल्पावरून वाद; विद्युत उपकरण उद्योग मध्य प्रदेशला

‘यशोदा’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हरी-हरीश यांनी केले असून हा चित्रपट तेलुगु-भाषेतील सायन्स फिक्शन अॅक्शन थ्रिलर आहे. यात समंथा सोबत उन्नी मुकुंदन, वरलक्ष्मी सरथकुमार आणि मुरली शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. समंथा या चित्रपटात सरोगेट आईची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाचही भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानंतर समंथाचे ‘शंकुतलम’ आणि ‘खुशी’ हे बिगबजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.