मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं आपलं मुख्य कार्यालय आता मुंबईऐवजी गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधून निर्णय गतीने घेण्यास मदत होईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. १३ जुलैला अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता. त्यानंतर आता मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवलं जाणार आहे.

“अदानी ग्रुप एअरपोर्ट सेक्टरमध्ये गतीने पुढे जात आहे. अशात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपलं मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.” असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचे आरके जैन यांना सीईओ एअरपोर्ट अशी जबाबदारी दिली आहे. जैन सुरुवातीपासून कंपनीसोबत काम करत होते. त्याचबरोबर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा ताबा मिळवण्यासाठी त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

Mumbai mnc Security Force Recruitment
मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलात लवकरच भरती, सुरक्षा अधिकाऱ्यांची १४०० पदे भरणार
nagpur, Director General of Police, rashmi shukla, rashtriya swayamsevak sangh, Headquarters, Surprise Security Check,
पोलीस महासंचालक संघ मुख्यालयात, काय आहे कारण…
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

पेगॅसस म्हणजे नेमकं काय?; फक्त मिस कॉल देऊनही ते तुमचा मोबाइल कसं हॅक करु शकतं?

कोणती विमानतळं अदानी समूहाकडे?

अदानी ग्रुपकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरु, जयपूर आणि तिरुवंतपुरम विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरुअनंतपुरममधील त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्क अदानी समूहाला देण्यात आले आहेत. लखनऊमधील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मंगळूरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हक्कही अदानी समूहाला विकण्यासंदर्भात २०१९ साली फेब्रुवारी महिन्यातच करार झाला होता. लखनौ, अहमादबाद आणि मंगळूरु विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सवलत देण्याच्या करारावर अदानी समूहाने १४ फेब्रुवारी २०२० रोजी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.