आदर्श प्रकरण : अशोक चव्हाणांसंबंधी न्यायालयाची विचारणा

‘आदर्श’ घोटाळ्यातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केली असली तरी त्याला सुरूंग लावत सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निकालानुसार

 ‘आदर्श’ घोटाळ्यातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केली असली तरी त्याला सुरूंग लावत सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निकालानुसार मंजुरीशिवाय त्यांच्यावर खटला चालविणार का, असा सवाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी करून त्याबाबत चार आठवडय़ांत उत्तर दाखल करण्याचे आदेश सीबीआयला दिले.
‘आदर्श’मधील बेनामी मालमत्तेच्या चौकशीची तसेच अशोक चव्हाण यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निकालानुसार मंजुरीशिवाय खटला चालविण्याची मागणी केतन तिरोडकर यांनी याचिकेद्वारे केली आहे. न्या.पी. व्ही. हरदास आणि न्या.अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी  सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने उपरोक्त विचारणा करून सीबीआयला हे आदेश दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Adarsh scam do you require sanction to prosecute ashok chavan