scorecardresearch

Premium

मुंबई : गणेशोत्सव काळात रात्री बेस्टची अतिरिक्त बससेवा

गणेशोत्सवानिमित्त मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने नागरिकांसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी १९ ते २७ सप्टेंबर या काळात रात्रीच्या वेळी अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

aamchi mumbai aamchi best
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : गणेशोत्सव सुरू झाला असून मुंबईमध्ये गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. तसेच देश-विदेशातील अनेक पर्यटक खास गणेशोत्सवात मुंबईला भेट देतात. गणेशोत्सवानिमित्त मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने नागरिकांसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी १९ ते २७ सप्टेंबर या काळात रात्रीच्या वेळी अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. रात्री कुलाबा परिसरातून उत्तर-पश्चिम मुंबईकडे गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूरमार्गे बस चालविण्यात येणार आहेत. बसमार्ग क्रमांक ४ मर्या., ७ मर्या., ८ मर्या., ए – २१, ए – ४२, ४४, ६६, ६९ व सी -४० या बसमार्गावर रात्रीच्या अतिरिक्त बस फेऱ्या होतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरात भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या मार्गावरील अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.  लालबाग येथे मंगळवारी सकाळी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने बेस्ट बस क्रमांक ६६ भारतमाता सिग्नलवरून चिंचपोकळी पुलाऐवजी करी रोड पुलामार्गे वळवण्यात आली. तसेच बसमार्ग ४४, ५० च्या मार्गातही बदल करण्यात आला. लालबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने डाऊन दिशेकडील बसमार्ग क्रमांक १, ४, ५, ६, ७, ८, ११, १५, १९, २१, २२, २५, ५१ लालबाग पुलावरून रवाना करण्यात आल्या. त्यानंतर रात्री हे सर्व मार्ग पूर्ववत करण्यात आले, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

In Pune mandap chariots on road
पुणे : मंडप, विसर्जन रथ रस्त्यांवरच; मंडळांवर कारवाई सुरू
pune-metro
पुणे: भाविकांचा मेट्रोकडे ओढा! रात्री उशिराच्या सेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद
metro during Ganeshotsav
पुणे: गणेशभक्तांनी खुशखबर! गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या वेळेत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
central railways collect fine rs 16 88 crore in one month from ticketless travellers
अमरावती: फुकट्या प्रवाशांमुळे मध्‍य रेल्‍वेला एका महिन्‍यात १६.८८ कोटींचे उत्पन्न

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Additional bus service of best at night during ganeshotsav mumbai print news ysh

First published on: 20-09-2023 at 14:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×