राज्यात सध्या शिंदे गट विरूद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष विधीमंडळातही बघायला मिळाला. आज अधिवशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आज अधिवेशन संपल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यामांशी बोलताना शिंदे सरकारतवर जोरदार टीका केली. या अधिवेशनात सरकारकडून अनेक आश्वासने देण्यात आली. मात्र, यापैकी एकही समानधानकारक नाही, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि…”, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांसमोरच सांगितला पहाटेच्या शपथविधीचा ‘तो’ किस्सा

“या अधिवेशनात सरकारकडून अनेक आश्वासने देण्यात आली. मात्र, यापैकी एकही पेपरवर आलेलं नाही आणि ती समानधानकारकही नाही. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रश्न राखीव ठेवण्यात आला. तसेच आदिवासींच्या प्रश्नांवरही सरकारकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाही”, अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली.

ते पुढं म्हणाले, “या अधिवेशनात आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले. शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा महिलांचे प्रश्न असतील, आम्ही विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलनं केली. तरीही या सरकारचे जनतेकडे लक्ष नाही. मी कालही बोलले आणि आजही बोलतो आहे, की राज्यातील राज्यातील मंत्र्यांचे बंगले घोषित झाले. मात्र, जिल्ह्यांचे पालकमंत्री अद्यापही घोषित झालेले नाही, हे अत्यंत दुर्देवी आहे”, असेही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – सोनाली फोगटच्या शरीरावर जखमा आढळल्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्येचा उलगडा; पोलिसांची पीएसह साथीदाराला अटक

“ज्या लोकांना माझ्याबद्दल, उद्धव ठाकरेंबद्दल किंवा मातोश्रीबद्दल मनात आदर आहे, असं म्हणत होते, त्यांचे चेहरे आता उघडे पडले आहे. जेव्हा या राज्यात एक चांगले सरकार काम करत होते, तेव्हा ज्या ४० आमदारांनी गटातटाचं राजकारणं केलं, याला काय म्हणायचं, ते स्वत:ला आता बंडखोर, खुद्दार, क्रांतीकारी म्हणत आहे. मात्र, शेवटी गद्दार ते गद्दारच असतात”, असा टोलाही त्यांनी लगावला.

या महाराष्ट्रात कोणालाही गद्दारी आवडलेली नाही. राज्यात सध्या अतिशय घाणेरडं राजकारण सुरू आहे. कोणत्याही व्यक्तीला न पटणारे हे राजकारण आहे. ही लोकशाहीला धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले.