मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईमधील अनेक भागात कचऱ्याचे ढिग साचू लागले असून त्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी तातडीने ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.
हेही वाचा >>> मुंबई: तस्करी प्रकरणात ३० वर्षांनी आरोपीला ताब्यात घेणे भोवले; अटकेचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबईमध्ये अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढिग साचू लागल्याच्या तक्रारी गेल्या तीन महिन्यांपासून नागरिक करीत आहेत. मुंबईमध्ये कोणत्याही भागात नियमित कचरा गोळा करण्याचे काम करण्यात येत नाही. मुंबईतील कचरा वेळीच उचलावा. नागरिकांच्या हितासाठी कारवाई करावी, अशी विनंती आदित्य ठाकरे
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray letter to bmc chief demand to disposed accumulated waste in city mumbai print news zws