scorecardresearch

VIDEO : मुंबईतील जुहू चौपाटीवर आदित्य ठाकरेंकडून ड्रम वादन; नेटकरी म्हणाले, “भाजपा अन् शिंदे गटाचा…”

राजकीय आखाड्यात विरोधकांशी दोन हात करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा एक वेगळाच अंदाज यावेळी मुंबईकरांनी अनुभवला.

VIDEO : मुंबईतील जुहू चौपाटीवर आदित्य ठाकरेंकडून ड्रम वादन; नेटकरी म्हणाले, “भाजपा अन् शिंदे गटाचा…”
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

मुंबईतील जुहू चौपाटी येथील ‘बिर्ला लेन’चं उद्घाटन शुक्रवारी आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे ठाकरे ड्रम वाजवताना दिसून आले. राजकीय आखाड्यात विरोधकांशी दोन हात करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा एक वेगळाच अंदाज यावेळी मुंबईकरांनी अनुभवला. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओची प्रचंड चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – “योगी आदित्यनाथ तुमच्या नाकासमोरून पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले, ही महाराष्ट्राची अवस्था” संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका!

राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या खासदार निधीतून मुंबईतील जुहू चौपाटी येथे बिर्ला लेनचं सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

या उद्घाटनानंतर आदित्य ठाकरे यांनी जवळच असलेल्या बिर्ला उद्यानात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तिथे आफ्रीकन बेंजो ड्रम वादन सुरू होतो. ते बघताच त्यांना ड्रम वाजवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी लगेच तिथे जाऊन ड्रम वाजवण्याचा आनंद लुटला.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या. एका ट्विटर युजर्सने ”आदित्य ठाकरे असाच भाजप आणि शिंदे गटाचा बँड वाजवणार”, अशी प्रतिक्रिया दिली. तर ”राजकारणात कला जोपासणारे कमी होत चालले आहेत असं वाटत होत, पण आदित्य ठाकरे यांना बघून बरं वाटलं”, अशी प्रतिक्रिया अन्य एका युजर्सने दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-01-2023 at 08:38 IST

संबंधित बातम्या