कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा तब्बल ११ हजार ४० मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीसाठी हे मोठं यश आहे. दरम्यान, या विजयानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Kasba Bypoll Election Result 2023: कसब्यात भाजपाच्या बालेकिल्ल्याला खिंडार; रवींद्र धंगेकरांचा विजय! हेमंत रासनेंनी मान्य केला पराभव

nanded lok sabha marathi news, nanded lok sabha latest marathi news
मतदारसंघाचा आढावा : नांदेड; निवडणूक चिखलीकरांची आणि नेतृत्व कसोटी अशोक चव्हाण यांची!
archana patil have large amounts of gold
अर्चना पाटील सर्वाधिक सुवर्णसंपन्न महिला उमेदवार
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
Lal bihari Mritak and PM Modi
जिवंत असून लाल बिहारींना करण्यात आलं होतं मृत घोषित, आता नरेंद्र मोदींविरोधात लढणार निवडणूक

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आज कसब्यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात जी गद्दारी झाली आणि राजकीय वातावरण निर्माण झाले, ते कोणालाही आवडलेलं नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच ३२ वर्षांनंतर ही जागा काँग्रेसकडे आली आहे. कसब्यासारख्या भाजपाच्या बालेकिल्ल्यात हे परिवर्तन होऊ शकतं, हे फार बोलकं आहे. हेच परिवर्तन आता पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात होणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Kasba Chinchwad Bypoll Election Result Live: कसब्यात विजयानंतर रवींद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझं हिंदुत्व…!”

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकआयुक्तांच्या नेमणुकीबाबत मोठा निर्णय देत एक समिती गठीत केली आहे. याबाबतही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायालयाचा हा निर्णय देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या आठवड्यातच उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की EC म्हणजे एंटायरली काँप्रोमाइज्ड आहे, असेही ते म्हणाले. तसेच न्यायालयाच्या या निर्णयाचा आयोगाने धनुष्यबाणाबाबत घेतलेल्या निर्णयावर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता, जर तर मध्ये जाण्यात काहीही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.