scorecardresearch

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावरून आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकारवर टीकास्त्र; म्हणाले, “कंत्राटदारांनी ‘वर्षा’वरून…”,

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.

aditya thckeray criticized shinde government,
अदित्य ठाकरे संग्रहित छायाचित्र

मुंबई महानगरपालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी महानगरपालिका आयुक्त, प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शनिवारी सादर केला. दरम्यान, या अर्थसंकल्पावरून शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ‘वर्षा’वरून कंत्राटदारांनी बनवलेला आहे, असं ते म्हणाले. आज पत्रकार परिषदे घेत त्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा – “पक्षाने चुकीचे एबी फॉर्म दिले,” सत्यजित तांबेंचा गौप्यस्फोट! पत्रकार परिषदेतच दिले पुरावे

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पासंदर्भात मी आयुक्तांना पत्र लिहित लोकप्रतिनिधी नसताना कोणाताही मोठा प्रकल्प घोषित करू नये, अशी मागणी केली होती. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात कोणताही मोठा प्रकल्प घोषित करण्यात आलेला नाही. इथेच आमचा मोठा विजय झाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात काही छोटे प्रकल्पही घोषित करण्यात आले आहे. त्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा – ‘काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार?’, सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “मी…”

“हा ‘वर्षा’वरून आलेला अर्थसंकल्प”

“आज जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. तो ५० हजार कोटी रुपयांच्या वर गेला आहे. या अर्थसंकल्पात कोणताही मोठा प्रकल्प नाही. अनेक प्रकल्प असे आहेत, जे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मग अशा परिस्थितीत हा अर्थसंकल्प ५० हजार कोटींच्या वर गेला कसा? पैसा नेमका कुठं खर्च होणार आहे? हे अद्यापही समजलेलं नाही. हा अर्थसंकल्प मुंबईकरांचा अर्थसंकल्प नसून वर्षा बंगल्यावरून आलेला कंत्राटदारांचा अर्थसंकल्प आहे”, अशी टीका ही त्यांनी केली.

हेही वाचा – BMC Budget : यंदा कोणतीही करवाढ नाही! निवडणुकीच्या तोंडावर पालिकेकडून मुंबईकरांना दिलासा

“हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला?”

पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या खर्चांवर आणि तरतुदींवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. “अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या फंडातले पैसे सौंदर्यीकरणासाठी वळवले आहेत. अर्थसंकल्पात सौंदर्यीकरणासाठीचे १,७०० कोटी हे मागच्या नगरसेवकांच्या फंडातून वळवले गेले. हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला? ते स्वतःहून असे पैसे वळवू शकतात का?” असा प्रश्न आदित्य यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 17:20 IST