मुंबई: महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधील पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले असून आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे. मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आजपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. पहिली गुणवत्ता यादी २७ मे रोजी जाहीर होणार आहे तर १३ जूनपासून नियमित वर्गांना सुरुवात होईल. विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व नोंदणी केल्याशिवाय महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी महाविद्यालयांना दिल्या आहेत. तसेच पदवीच्या प्रथम वर्षासाठी होणारे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होणार आहे.

प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक :

– अर्ज विक्री (ऑनलाईन/ऑफलाईन) : ८ ते २३ मे, २०२५ (दुपारी १ वाजेपर्यंत) – प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया : ८ ते २३ मे, २०२५ (दुपारी १ वाजेपर्यंत)

– ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर कणे (इन हाऊस आणि अल्पसंख्याक कोटा) : ८ ते २३ मे, २०२५

– पहिली गुणवत्ता यादी : २७ मे, २०२५ (सकाळी ११ वाजता)- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : २८ ते ३० मे, २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)

– दुसरी गुणवत्ता यादी : ३१ मे २०२५ (सायंकाळी ७ वाजता) – ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे – २ ते ४ जून २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)- तिसरी गुणवत्ता यादी : ५ जून, २०२५ (सकाळी ११ वाजता)

– ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे : ६ ते १० जून २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)- नियमित वर्ग सुरू : १३ जून २०२५

या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी

बी.ए, बी.एस्सी, बी.कॉम, बीए.एमएमसी, बी.एसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलेव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए ( इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम ( अकॉउन्टींग अँड फायनान्स), बीकॉम ( बँकिंग अँड इन्शुअरन्स), बीकॉम ( फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम ( इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम ( ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम ( मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पीटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी ( बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी ( मेरिटाईम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी ( एरॉनॉटिक्स), बीएस्सी ( डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हीएशन), बीएस्सी (ह्युमन सायन्स), बी.व्होक (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनेलिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय.बीएस्सी ( बायोएनॅलिटिकल सायन्स- पाच वर्षीय एकात्मिक अभ्यासक्रम)