पालिकेच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई), आयसीएसई व आयबी आणि केंब्रीज आयजीसीएसई या मंडळाच्या शाळांमधील नर्सरीसाठीची प्रवेश प्रक्रिया येत्या ४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ४ ते २२ जानेवारी या कालावधीत केवळ पूर्वप्राथमिकच्या जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे.गेल्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२ )पालिकेच्या शिक्षण विभागाने पालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसईच्या ११ व आयसीएसईची एक शाळा सुरु केली आहे. माहीमच्या वूलन मिल शाळेत आयसीएसईची शाळा सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>“सुशांतची हत्या झाली होती, पण अधिकाऱ्यांनी…”; कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दाव्याने खळबळ

Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
msrtc, ST Corporation, Extends, Free Travel Facility, Retired, Employees, Spouses, marathi news, maharashtra,
आनंद वार्ता! निवडणुकीच्या तोंडावर निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय…
exam, exam paper
परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; आता २ ते ४ एप्रिलऐवजी ४ ते ६ एप्रिल दरम्यान परीक्षा
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

या बारा शाळांबरोबरच पालिकेची पहिली आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची म्हणजेच ‘आय.बी.’ शाळा विलेपार्ले येथील दीक्षित रस्त्यावरील पालिकेच्या शाळेत यावर्षी सुरू झाली. केंब्रीज मंडळाशी संलग्न ‘आय.जी.सी.एस.ई.’ मंडळाची शाळा माटुंगा येथील लक्ष्मीनारायण रस्ता येथील एल के वाघजी शाळेत सुरू झाली. या चौदा शाळांमधील नर्सरीच्या वर्गासाठीची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होणार आहे.चालू शैक्षणिक वर्षासाठी यावर्षी जानेवारीत सीबीएसई व आयसीएसई शाळांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र पालकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे या शाळांमध्ये नर्सरी व ज्युनिअर केजीची प्रत्येकी एक तुकडी वाढवण्यात आली. एका तुकडीत ४० विद्यार्थी अशा प्रत्येक शाळेत ८० जागा वाढल्या. त्यामुळे ११ सीबीएससी व एक आयसीएसई अशा १२ शाळांमध्ये मिळून एकूण ९६० जागा वाढल्या होत्या. त्यामुळे आता मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकणार आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे विचलीत झाल्याने तुनिषापासून विभक्त झालो, शिझान खानचा दावा

सीबीएसईच्या शाळा कुठे ?
भवानी शंकर रस्ता पालिका शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतिक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कुर्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व)