मुंबई : इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानच्या दूतावास अधिकारी झाकिया वारदक यांनी ४ मे रोजी अफगाणिस्तानच्या दूतावास अधिकारीपदाचा राजीनामा दिला. झाकिया वारदक यांच्यावर २५ किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महसूल गुप्तहेर संचालनालयाचने (डीआरआय) २५ एप्रिल रोजी मुंबई विमानतळावर १८.६ कोटी रुपये किंमतीचे सोने पकडले. झाकिया वारदक यांच्यावर १९६२ कायद्याअंतर्गत सोन्याच्या तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. झाकिया वारदक यांनी आपली बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप करीत दूतावास अधिकारीपदाचा राजीनामा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या आठवड्यात, डीआरआयला दुबई येथून भारतात आलेल्या झाकिया वारदक यांच्याकडे सोने सापडले होते. तथापि, वारदक या वरिष्ठ पदावर असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नव्हती. वारदक आणि त्यांचा मुलगा २५ एप्रिल रोजी दुबईहून एमिरेट्सच्या विमानाने मुंबई विमानतळावर पोहोचले. मुंबई विमानतळावर डीआरआय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. तपासणीत त्यांच्या सामानात काहीच सापडले नाही, परंतु अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे २४ हून अधिक सोन्याच्या लगड सापडल्या. यासंदर्भात वारदक यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे हे सोने जप्त करण्यात आले.

हेही वाचा – अनुज थापन याची आत्महत्या नाही, मृत्यूची सीबीआय चौकशी करा, मागणीसाठी अनुजच्या आईची उच्च न्यायालयात याचिका

हेही वाचा – मद्यविक्रीचा बंदीचा आदेश मतदान काळ आणि मतदारसंघापुरता मर्यादित, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

यासंदर्भात वारदक यांनी शनिवारी निवेदन जारी केले. गेल्या वर्षभरात माझी आणि माझ्या कुटुंबियांची बदनामी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. अफगाण समाजातील स्त्रियांसमोरील अनेक आव्हाने आहेत. मला बदनाम करण्याच्या आणि माझ्या देशातील सकारात्मक बदलांचा भाग होण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्याच्या उद्देशाने हे करण्यात येत आहे. त्यामुळे, मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Afghanistan embassy official zakia wardak resigns mumbai print news ssb