“शिवसेनेत असतांना पंचायत समितीवर भगवा फडकवून जिल्हा परिषदेत पाच सदस्य नेत न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली. पक्ष निष्ठता कधीही सोडली नाही. मी कार्यकर्त्यांच्या जोरावर ७ निवडणूका लढले. परंतु मला परकियांनी पराजित केलं नाही. मला स्वकीयांनीच पराजित केलं, छत्रपतींना जसा स्वकीयांकडून त्रास झाला तसाच मलाही झाला”, असा आरोप भाजपात प्रवेश केलेल्या आशा बुचके यांनी केला आहे.

आशा बुचके यांनी आज मुंबईत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचा पुणे जिल्ह्यात शिवसेनेला हा जोरदार झटका मानला जात आहे. यावेळी त्यांनी आपल्या भावणा व्यक्त केल्या.

uddhav thackeray eknath shinde devendra fadnavis
“फडणवीसच नव्हे, मविआच्या काळात आणखी तीन भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला”, एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis Slams Rahul Gandhi in Chandrapur Rally Speech
“त्या नादान राहुल गांधींना जाऊन सांगा जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत…”, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
mla ram satpute slam sushilkumar shinde over development
सोलापूरच्या पूर्वीच्या नेतृत्वाने ७५ वर्षांच्या विकासाचा हिशेब द्यावा; आमदार राम सातपुते यांचे सुशीलकुमार शिंदे यांना आव्हान
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

भाजपा माझा पिंड

आशा बुचके म्हणाल्या, “शिवसेनेत असतांना कार्यकर्ता केंद्रबिंदू माणून मी काम केलं. प्रत्येक निवडणूक माझी निवडणूक म्हणून काम केलं. माझा सरपंच झाला पाहिजे, माझा सद्स्य झाला पाहिजे, या भावणेतून काम केले. भाजपा माझा पिंड असल्यामुळे संघटना आणि संघटनात्मक काम हे रक्तातचं होतं. ते घेऊन कार्यकर्त्याला मोठं करत असतांना तो सदस्य तरी व्हावा, यासाठी वर्षाचे बारा महीने कष्ट केले. आणि जुन्नर नगरपरीषदेची निवडणूक काबीज केली. तसेच पंचायत समितीवर भगवा फडकवून जिल्हा परिषदेत पाच सदस्य नेत न्याय देण्याची भूमिका कायम ठेवली, ”

विधानसभा निवडणूक हारली तरी…

“विधानसभा निवडणूक हारली तरी देखील दुसऱ्या दिवशी लोकांचे आभार मानले, हे फक्त कार्यकर्यांच्या जोरावर करता आले. ज्याच्या पाठीमागे कार्यकर्ता असतो तोच खरा नेता होऊ शकतो. हे समीकरण कायम जुडवण्याचं काम मी केलं. पक्षाचा (शिवसेना) विश्वास मी विसरु शकत नाही. पण न्याय देत असतांना ज्यावेळी माझ्यासारख्या महिलेची काहींच्या सांगण्याने पक्षातून हकालपट्टी होते. मात्र या संकटात कार्यकर्त्यांनी माझी पाठ सोडली नाही”, असे आशा बुचके म्हणाल्या.