महारेरा नोंदणीकृत दलालांमध्ये देशभरातली दीडशे शहरांतील दलालांचा समावेश
मुंबई…महारेरा नोंदणीकृत गृहनिर्माण प्रकल्पांनी ५० हजारांचा टप्पा पार केल्यानंतर आता स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची अशी भूमिका बजावणाऱ्या दलालांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. महारेरा नोंदणीकृत दलालांची एकूण संख्या ५० हजार ६७३ अशी असून त्यात केवळ महाराष्ट्रातीलच दलालांचा नाही तर नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबादसह दीडशे महत्त्वाच्या शहरातील दलालांचा समावेश आहे.
महारेरा नोंदणी दलालांना बंधनकारक
रेरा कायद्यानुसार प्रत्येक नवीन गृहनिर्माण प्रकल्पांची महारेरा नोंदणी करणे विकासकांना बंधनकारक आहे. या नोंदणीशिवाय विकासकांना घराची जाहिरात करता येत नाही वा घरे विकता येत नाहीत. तर विकासकांना आणि स्थावर संपदा क्षेत्रात दलाल म्हणून काम करणार्यांनाही महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. महारेरा नोंदणी असलेल्या दलालांनाच काम करता येते. महारेराकडील दलालांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे.
आजच्या घडीला ५० हजार ६७३ दलाल महारेरा नोंदणीकृत दलाल आहेत. दलालांची ही संख्या देशातील विक्रमी, पहिल्या क्रमांकाची संख्या आहे. नोंदणीकृत दलालांपैकी सध्या सक्रिय दलालांची संख्या ३१ हजार ९८० आहे. तर १८ हजार ६९३ दलालांनी काही कारणास्तव नोंदणी रद्द केली आहे. नोंदणीकृत दलालांमध्ये राज्यातील दलालांसह नवी दिल्ली, गुरगाव, प्रयागराज, हैद्राबाद, बंगळुरू, कांचीपुरम, नैनिताल, गोवा, अहमदाबाद, पटना, जम्मू, इंदोर अशा अंदाजे दीडशे महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे. म्हणजेच या शहरातील नोंदणीकृत दलाल महाराष्ट्रातील स्थावर संपदा क्षेत्राशी संबंधित व्यवहार करतात.
महारेरा नोंदणीकृत ५० हजार दलालांपैकी सर्वाधिक दलाल मुंबई महागनर प्रदेशाचा समावेश असलेल्या कोकणातील दलालांचा आहे. कोकणतला २१ हजार ५० दलाल महारेरा नोंदणीकृत दलाल आहेत. त्यानंतर पुणे परिसरात ८२०५,नागपूर परिसरात १५०४,उत्तर महाराष्ट्रात ४९०, संभाजीनगर परिसरात ३४३ आणि अमरावती परिसरात २३७ दलाल नोंदणीकृत आहेत.
महाराष्ट्रातील परिसर निहाय नोंदणीकृत दलालांचा तपशील
कोकण- २१०५०
मुंबई शहर- ३४५७
मुंबई उपनगर- ८३६५
ठाणे- ६७६०
रायगड- १३४०
पालघर- १०८६
रत्नागिरी- ३१
सिंधुदुर्ग- ११
पुणे परिसर- ८२०५
पुणे -७९३१
कोल्हापूर-८४
सातारा- ७६
सोलापूर-७०
सांगली- ४४
नागपूर परिसर- १५०४
नागपूर- १३५७
चंद्रपूर- ५७
भंडारा- ४५
गोंदिया – ४०
गडचिरोली- ५
उत्तर महाराष्ट्र- ४९०
नाशिक- ३२४
अहिल्यानगर- ९२
जळगाव-५३
धुळे- १९
नंदुरबार- २
संभाजीनगर परिसर- ३४३
संभाजीनगर – १३२
बीड- ६८
लातूर- ४६
नांदेड- ३७
धाराशीव- २७
परभणी – १४
जालना – ११
हिंगोली – ८
अमरावती परिसर- २३७
वर्धा – ९५
अमरावती – ४८
अकोला – ३६
बुलडाणा – २९
यवतमाळ- २७
वाशिम – २