महावितरणाचे विद्युत सहाय्यक पदासाठी अद्याप भरती करण्यात आलेली नाही. पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करूनहा सात महिन्यांपासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे. अखेर पात्र उमेदवारांनी आझाद मैदानात आंदोलन करण्यात येत आहे.

हेही वाचा- मुंबई : नवरात्रीत रंगीबेरंगी खड्डे , वाचडॉग फाऊंडेशनचा उपक्रम

पात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्याचा मंडळाचा प्रयत्न

गेल्या आठ दिवसांपासून उमेदवार उपोषणाला बसले असून सोमवारी महावितरणाच्या निषेधार्थ आंदोनकर्त्यांनी स्वतःचे मुंडण करून घेतले.
राज्यातील महावितरण विद्युत सहाय्यक पदभरती जाहिरातीच्या प्रतीक्षा यादीतून निवड झालेल्या पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून सात महिने झाले तरी, नियुक्ती देण्यात आली नाही. ऐनवेळी प्रतीक्षा यादीच्या प्रचलित नियमात बदल करून कागदपत्रे पडताळणी झालेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्याचा प्रयत्न महावितरण मंडळ करत आहे, असा आरोप उमेदवारांनी केला आहे. प्रतीक्षा यादीच्या कागदपत्रे पडताळणीत २२६९ पात्र उमेदवारांना कायदेशीर त्रुटी दूर करून त्वरित नियुक्ती द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.