मुंबई : लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त्याने अनेकजण कोकणात फिरायला जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावरून विशेष अहमदाबाद-थिवि रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. नाताळ, नववर्ष साजरा करण्यासाठी गोवा आणि कोकण हे अनेकांचे आवडते स्थळ आहे. या काळात नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी प्रचंड वाढते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कररित्या व्हावा, यासाठी विशेष रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – रेल्वे गाड्यांच्या डब्यात बदल

हेही वाचा – मुंबईच्या किमान तापमानात घट

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेने अहमदाबाद-थिवि द्वि-साप्ताहिक रेल्वेगाडी चालवणार आहे. ही विशेष रेल्वेगाडी ८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत चालवली जाईल. प्रत्येक रविवार आणि बुधवारी दुपारी २.१० वाजता अहमदाबाद स्थानकातून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता थिवि स्थानकावर पोहोचेल. तर, थिवि-अहमदाबाद ही विशेष रेल्वेगाडी ९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी चालवली जाईल. ही रेल्वेगाडी सकाळी ११.४० वाजता थिवि स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता अहमदाबाद स्थानकावर पोहोचेल. या रेल्वेगाडीला आणंद, वडोदरा, भरुच, उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकावर थांबा असेल, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली.