मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वातानुकूलित लोकल रविवार, १५ मे लाही धावणार आहे. तिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला. प्रत्येक रविवारी लोकल धावतानाच सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशीही वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या सेवेत असेल. दर रविवारी १४ फेऱ्या वातानुकूलित लोकलच्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. १४ मे पासून हार्बरवरीलही वातानुकूलित लोकल बंद करून त्याच्या १६ पैकी १२ फेऱ्या सीएसएमटी ते ठाणे, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

एसी लोकलचे वेळापत्रक..

  • कुर्ला ते सीएसएमटी- प. ४.४६ वा, स.९.५६ वा
  • डोंबिवली ते सीएसएमटी- प.४.५५ वा आणि दु.३.२४
  • कल्याण ते दादर- स.११.२२ वा
  • कल्याण ते सीएसएमटी- स.६.३२ आणि स.८.५४ वा
  • बदलापूर ते सीएसएमटी -दु.१.४८वा  सीएसएमटी ते कल्याण- प.५.२०वा.स.७.४३, स.१०.०४ आणि संध्या ६.३६ वा
  • दादर ते बदलापूर- दु १२.३० वा

पश्चिम रेल्वेवरही आणखी १२ वातानुकूलित फेऱ्या; १६ मेपासून प्रवाशांच्या सेवेत

मुंबई: तिकीट दर कपातीनंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याने पश्चिम रेल्वेने सोमवार, १६ मेपासून वातानुकूलित लोकलच्या आणखी १२ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील वातानुकूलित फेऱ्यांची संख्या २० वरून ३२ होणार आहे. प्रत्येकी सहा फेऱ्या अप आणि डाऊन मार्गावर होतील. यामध्ये अप मार्गावर विरार ते चर्चगेटपर्यंत पाच फेऱ्या, एक फेरी भाईंदर ते चर्चगेट होणार आहे. तर डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरार चार फेऱ्या, चर्चगेट ते भाईंदर एक आणि अंधेरी ते विरारही एक फेरी होईल.

५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात करण्यात आली. यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांनाही प्रतिसाद वाढू लागला आहे. आधी दिवसाला दीड ते तीन हजार तिकिटांची विक्री होत असतानाच आता पाच हजारपेक्षा जास्त तिकिटांची विक्री होते.

वेळापत्रक

  • चर्चगेट ते विरार- स.९.२७ वा., दु.१२.३४ वा., सायं.६.११ वा., रा.११.२३ वा.
  • चर्चगेट ते भाईंदर- दु. ३.४४ वा.,
  • विरार ते चर्चगेट- स.७.५७ वा., स.१०.५८ वा, दु.२.०९ वा., स.७.४८ वा., स.९.४८ वा.
  • अंधेरी ते विरार- रा.८.५० वा.
  • भाईंदर ते चर्चगेट- सायं. ५.०२ वा.