मुंबईच्या ‘बीकेसी’त हवाई दलाचे हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत उतरवले

हेलिकॉप्टरच्या हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड झाल्याने बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात आपत्कालीन लँडिंग

बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात आपत्कालीन लँडिंग.

मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात(बीकेसी) हवाईदलाचे ‘एमआय १७’ या हेलिकॉप्टर आपत्कालीन स्थितीत उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरच्या हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड झाल्याने या हेलिकॉप्टरचे बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानात आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर सुरक्षीतरित्या उतरविण्यात आले असून पायलट आणि सहकारी सुरक्षित असल्याचे कळते.
एमआय १७ हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाच्या मुंबई एअरबेसला जात होते. मात्र, हायड्रॉलिक यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने आपत्कालीन लँडिंगसाठी विनंती केली आणि हेलिकॉप्टरचे मैदानात लँडिंग करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Air force chopper makes emergency landing in mumbais bandra kurla complex

ताज्या बातम्या