मुंबई : एअर इंडिया एक्स्प्रेसचे ‘द फ्लाइंग कॅनव्हास’ (कला – आच्छादित) बोईंग ७३७-८ विमान प्रवासी सेवेत दाखल झाले आहे. कोची – मुझिरिस द्वैवार्षिक कला प्रदर्शनातील कलाकार ओशीन शिवा यांच्या मूळ कलाकृतीने आच्छादित विमान एअर इंडिया एक्स्प्रेसच्या भारताच्या कथा (‘Tales of India’) उपक्रमाचा विस्तार आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसचा विमानसमूह

देशाच्या सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे एक ‘फिरते प्रदर्शन’ म्हणून कार्यरत आहे. विमानांच्या शेपटीवरील विविध कलाकृतींमध्ये राजा रवि वर्मा यांच्या चित्रांपासून ते राष्ट्रीय वारसा स्थळांपर्यंत आणि कथकली, कथक व भरतनाट्यम सारख्या शास्त्रीय कलाप्रकारांच्या प्रतिमांपर्यंत विविध रूपांचा समावेश असतो. ऑक्टोबर २०२३ मध्ये विमान कंपनीची ‘ब्रँड ओळख’

नव्या स्वरूपात सादर केली, तेव्हाच ‘Tales of India’ या उपक्रमाचाही शुभारंभ झाला. या उपक्रमांतर्गत,प्रत्येक नवीन विमानाची शेपटी एका अद्वितीय कलात्मक नक्षीने सजवली जाते. नक्षी कलमकारी, बांधणी, कांजीवरम आणि बनारसी यांसारख्या स्थानिक हस्तकला, वस्त्रकला आणि परंपरांपासून प्रेरित असते. ‘द फ्लाइंग कॅनव्हास’ याच सांस्कृतिक-कलात्मक तत्त्वज्ञानाचा सर्वात अद्ययावत विस्तारासह नाविन्यपूर्ण आविष्कार आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेस आणि ‘कोची – मुझिरिस द्वैवार्षिक कला प्रदर्शन’ म्हणजे भारतातील समकालीन कलेचे पहिले आणि सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मानले जाते. ओशीन शिवा यांनी साकारलेल्या मूळ कलाकृतीने विमानाची शेपटी रेखाटली आहे. या कला – सजावटीमध्ये एका तमिळ आकृतीचे चित्रण केले आहे. कला ही सर्वात शक्तिशाली आणि वैश्विक भाषांपैकी एक आहे.

कला सीमा, संस्कृती आणि भौगोलिक प्रदेशांच्या पलीकडे जाऊन नागरिकांना एकत्र जोडते. विमान ६० हून अधिक गंतव्यस्थानांवर प्रवास करताना, ते आपल्यासोबत स्थानिक संस्कृतीचा आत्मा आणि समकालीन कलेचा प्रसार जगभरात करेल – सिद्धार्थ बुटालिया, मुख्य विपणन अधिकारी, एअर इंडिया एक्स्प्रेस