एसटी संपावर तोडगा निघणार? अजित पवार-अनिल परब शरद पवारांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेत.

मागील अनेक दिवसांपासून एसटी बस कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासह पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे एसटी संपावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. दरम्यान, नेहरू सेंटर येथे याबाबत महत्त्वाची बैठक सुरू आहे.

एसटी संपाला भाजपाने पूर्ण पाठिंबा देत या आंदोलनात आपले नेते उतरवले आहेत. भाजपा नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात ठाण मांडून आहेत. त्यामुळे हे आंदोलन ताणलं गेल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे यावर महाविकासआघाडी सरकार काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : आर्थिक अडचणीत सापडलेल्या ‘एसटी’ला शासनाकडून दिलासा ; ६०० कोटी रुपयांची मदत मिळणार

एसटी संपाबाबत बैठकीत काय चर्चा?

शरद पवार यांनी अनिल परब यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. यानंतर वरळीतील नेहरू सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत एसटीच्या विलिनीकरणासोबतच पगारवाढीवर चर्चा झाली. पवारांनी सरकारने उच्च न्यायालयाच्या समितीसमोर काय भूमिका मांडली पाहिजे यावरही सूचना केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ajit pawar and anil parab meet sharad pawar amid st bus employee protest pbs

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या