गेल्या दोन दिवसांपासून नागालँडमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नागालँडमध्ये स्थानिक एनडीपीपी पक्ष आणि भाजपाच्या युतीला बहुमत मिळालं. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं युतीला पाठिंबा जाहीर केला. मात्र, भाजपाच्या युतीला राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिल्याामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. यावरून सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलेलं असतानाच अर्थसंकल्पीय अधिवेशनात या मुद्द्यावरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित करताच अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी भर सभागृहात पाटलांना सुनावलं.

नेमकं काय झालं?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अवकाळीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यासंदर्भात चर्चा चालू असताना राजकीय टोलेबाजी सुरू होताच कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँडमधील परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

“या देशात आणि राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले अशी वक्तव्य आम्ही टीव्हीवर बघत आहोत. नागालँडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपाच्या फक्त मुख्यमंत्र्याला पाठिंबा दिला आहे. म्हणजे बदलाचे वारे नेमके कसे वाहायला लागले आहेत? नागालँडमध्येही ५० खोके, बिलकुल ओके असं काही झालंय का? एकीकडे इथे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून बसायचं असं चित्र निर्माण झालंय. ५० खोके आणि बिलकुल ओके, नागालँड ओके असं झालंय का?” असा खोचक सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

अजित पवार भडकले, म्हणाले – करा ना चौकशी!

दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार चांगलेच संतापले. सगळ्याच मुद्द्यांवर राजकारण करायचं नसतं, असं अजित पवार यावेळी म्हणाले. “मंत्रीमहोदयांना आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. गुलाबराव पाटलांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायला हवं असं नाहीये. राज्य सरकार, केंद्र सरकार, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना. ही कुठली पद्धत काढली? तुमच्या हातात आहे ना? मग करा ना चौकशी. कारण नसताना कुणावरही कसलेही आरोप का करताय?” असा संतप्त सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

“नागालँडमधली परिस्थिती वेगळी आहे. तिथे सर्व पक्ष एकत्र मिळून सरकार स्थापन करतात अशी परंपरा आहे. भारतातला तो भाग भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज पसरवण्याचं काहीच कारण नाही”, असंही अजित पवारांनी यावेळी नमूद केलं.