Ajit Pawar Death News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असून राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अजित पवार यांच्या निधनामुळे एक दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. पवार यांचे निधन ही
अतिशय दुःखद घटना आहे. अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककाळा पसरली. खर म्हणजे अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता, ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती.

अजित दादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचे नेतृत्व होतं आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे. कारण अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचे निघून जाणं हे अविश्वासनीय आहे. मनाला चटका लावणारे आहेअसे सांगून फडणवीस यांनी आज आपण एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली.

पवार कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. आपण आणि एकनाथराव शिंदे ल आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत. सकाळपासून आपण सगळ्यांच्या संपर्कात आहे. प्रधानमंत्री, गृहमंत्री आदी सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना दिली आहे. त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख व्यक्त केले आहे. एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परिवाराचे चर्चा करून ठरवण्यात येतील असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारे अशा प्रकारचे नुकसान आहे. महाराष्ट्रात मोठे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी तयार होते ती भरून काढणं हे अतिशय कठीण आहे.