Mahaparinirvan Diwas : बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, यात कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने आज अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद नाही, तर मुलाखत होते”, सुषमा अंधारेंची खोचक टीका; म्हणाल्या, “भाजपाच्या एकाही विद्वानाने…”

“आज घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच आज तुमचा-माझा भारत देश एकसंघ राहिला आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारचे वातावरण आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते आहे. सर्वधर्म समभाव हीच भूमिका घेऊन बाबासाहेबांनी शेवटपर्यंत त्यांची वाटचाल सुरू ठेवली होती”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा – “पंढरपूरमधील विठोबाही…”; कर्नाटकचा उल्लेख करत शिंदे-भाजपा सरकारच्या धोरणांबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संताप

“आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना सामाजिक न्याय खात्याची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे होती. त्यावेळी मी अर्थमंत्री असताना त्यांना नेहमी सांगायचो, की इंदू मिल इथे होणारे बाबासाहेबांचा स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, आर्थिक अडचण येऊ दिली जाणार नाही. मात्र, आता सरकार बदलले आहे. आम्ही आता विरोधीपक्षात आहोत. आमची अपेक्षा आहे की सरकारनेही या प्रकरणात लक्ष घालावं आणि लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण करावं, यात कोणीही राजकारण आणू नये. यावरून आरोप-प्रत्यारोप होता कामा नये”, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच बाबासाहेबांच्या नावला साजेसं असं स्मारक व्हायला हवं, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar pay tribute to babasaheb ambedkar on paharinirvan day ask government to complete work of indu mill smarak spb
First published on: 06-12-2022 at 09:17 IST