मुंबई : मुस्लीम आरक्षणाला भाजपचा विरोध आहे. कर्नाटकमध्ये मुस्लीम समाजाला दिलेले आरक्षण भाजप सरकारने रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा आढावा घेतल्याचे समजते.
राज्यात २०१४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार असताना मराठा समाजास १६ टक्के व मुस्लीम समाजास ५ टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात आला होता. मात्र हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही. या दोन्ही घटकांचे आरक्षण रद्द झाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. मात्र मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. यामुळे अजित पवार
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar review muslim reservation ignoring bjp oppose zws