scorecardresearch

Premium

अजित पवार आजही भाजप नेत्यांना अमान्य? मोहित कंबोज यांच्या समाजमाध्यमातील संदेशावरुन वाद

मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नाही, तर १४५ आमदार लागतात, अशी टीका करणारा संदेश भाजप नेते मोहित कंबोज-भारतीय यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने वाद सुरु झाला.

mohit kamboj ajit pawar
मोहित कंबोज, अजित पवार

मुंबई : मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नाही, तर १४५ आमदार लागतात, अशी टीका करणारा संदेश भाजप नेते मोहित कंबोज-भारतीय यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने वाद सुरु झाला. अजित पवार गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कंभोज यांना तंबी दिली व त्यानंतर त्यांनी संदेश समाज माध्यमावरून हा संदेश काढून टाकला. गोपीचंद पडाळकर यांच्यापाठोपाठ कंबोज यांनी अजित पवारांच्या विरोधात टीकात्मक सूर लावल्याने भाजप नेत्यांनी अजितदादांना अद्यापही स्वीकारले नसल्याचेच स्पष्ट होते.

 अजित पवार यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यावर एका कार्यकर्त्यांने ते मुख्यमंत्री व्हावेत, अशी गणरायाची प्रार्थना करणारा संदेश समाजमाध्यमांवरुन प्रसारित केला. त्यावर कंबोज यांनी ‘मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नाही, तर १४५ आमदार लागतात,’ असे प्रत्युत्तर दिले. त्यावरुन वाद सुरु झाला आणि पवार गटाने ही बाब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ भाजप नेत्यांच्या निदर्शनास आणली. वरिष्ठ नेत्यांनी कंबोज यांना तंबी देवून समाजमाध्यमांवरील संदेश मागे घ्यायला लावला. यासंदर्भात वारंवार संपर्क साधूनही कंबोज यांनी प्रतिसाद दिला नाही.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर गेल्या एक वर्षांहून अधिक काळात भाजप नेते व कार्यकर्त्यांनी काही प्रमाणात तरी त्यांना स्वीकारले आहे.

chandra shekhar bawankule
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अमृतकाळाचे साक्षीदार होण्यास सज्ज व्हा; चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Nitin Gadkari in Washim 3
“…तर ठेकेदाराला बुलडोझरखाली फेकेन”; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
CM Eknath Shinde criticised uddhav tackeray
पोटदुखीवाल्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रम; पाचोऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Ajit Pawar-Janyat Patil
जयंत पाटील यांच्या विरोधकांना अजित पवारांचे बळ

काही मतदारसंघात मतभेद असले, तरी शिवसेनेबरोबर गेली २५-३० वर्षे युतीत राहिल्याने ते भाजप नेत्यांना सवयीचे झाले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात गेली १०-१५ वर्षे जोरदार प्रचार व विरोध केल्यानंतर सत्तेत सामील झालेल्या पवार यांना स्वीकारणे, भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जड जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी उघड, तर काही ठिकाणी छुप्या पध्दतीने भाजप व अजित पवार गटातील नेत्यांमध्ये संघर्ष किंवा कुरघोडय़ांचे राजकारण सुरु आहे. पवार यांची कार्यशैली आणि घेतलेले निर्णय अनेक भाजप नेत्यांना मान्य नसल्याने असे वादाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar unacceptable to bjp leaders controversy over mohit kamboj social media message ysh

First published on: 28-09-2023 at 00:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×