मुंबई : विमानसेवेचा विस्तार आणि वैमानिकांना कंपनीला टिकवून ठेवण्याचा उद्देशाने अकासा एअऱने वैमानिकांच्या वेतन आणि कामाच्या अटीमध्ये बदल केला आहे. नवीन वेतन रचना आणि इतर बदल १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार आहे. या अंतर्गत वैमानिकांच्या वेतनात २० टक्यांपर्यत वाढ,किमान ४२ दिवसांची वार्षिक रजा आणि कामाच्या वेळापत्रकात अधिक पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

नव्या वेतनरचनेत निश्चित मासिक वेतन आणि उड्डाणाच्या तासांनुसार मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ केली जाणार आहे. तसेच, प्रमाणित कामकाजाच्या पद्धतीनुसार वैमानिकांना दरमहा किमान ५० तासांच्या संरक्षित उड्डाण वेळेचे वेतन मिळेल. प्रत्यक्ष उड्डाणाचे तास यापेक्षा कमी असले, तरी निर्धारित अर्टीनुसार या किमान वेळेचा मोबदला दिला जातो.

याचसोबत अकासा एअरने वैमानिकांसाठी किमान वार्षिक दिवसांपर्यंत रजेचे प्रमाण ४२ वाढविण्याचे ठरविले आहे. नविन कार्यप्रणालीत दोन पर्यायी कामकाजाच्या पद्धती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ””२५/९”” या पद्धतीत महिन्यात २५ दिवस काम आणि नऊ दिवस निश्चित सुटी असेल. दुसऱ्या ””६-२-६-३”” पद्धतीत सहा दिवस काम, दोन दिवस सुटी, पुन्हा सहा दिवस काम आणि त्यानंतर तीन दिवस सुटी असे वेळापत्रक असेल. याशिवाय, वैमानिकांना यापूर्वी जाहीर केलेल्या लॉयल्टी रिवॉर्ड्स आणि दीर्घकालीन प्रोत्साहन योजनेचा (एलटीआयपी) लाभही मिळणार आहे.

वेतन वाढ,कामाच्या अटीचे फायदे

पगार वाढ: वैमानिकांच्या निश्चित पगारात आणि तासभराच्या पेआउटमध्ये २० टक्यांपर्यंत वाढ केली आहे. उडान उडाण तास: दर घटनाला एकत्रित गॅरेंटीड / संरक्षित उड्डाणाचे तास वाढवणे ५० तास आहेत. वार्षिक सुट्या: वैमानिकसाठी वार्षिक रजा विकास ४२ दिवस कायम केली आहे. लव कामाचे पॅटर्न: वैमानिकांना ””२५/९”” आणि ””६-२-६-३”” सारखे नवीन रोटर पॅटर्न निवडण्याचा पर्याय वापरला जातो. लाभार्थी: या निर्णयाचा निर्णय कंपनीच्या ८०० अधिक वैमानिक होणार आहे. डीजीसीएच्या घडामोडींच्या नियमाच्या परिस्थिती व वैमानिकांचा दूर करण्यासाठी हा निर्णय आहे.