पर्यावरण संवर्धनासाठी उद्योग क्षेत्राचा पुढाकार

मुंबई : वातावरण बदलाच्या दृष्टीने विविध क्षेत्रांतून पावले उचलली जात असताना आता पर्यावरण संवर्धनासाठी उद्योग क्षेत्रही सरसावले आहे. उद्योग क्षेत्रात विविध उत्पादनांसाठी वेष्टण म्हणून वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी २७ कं पन्या एकत्र आल्या आहेत. २०३० सालापर्यंत १०० टक्के  प्लास्टिक वेष्टणे पुनर्वापरायोग्य वापरण्यासाठी आराखडा तयार के ला जाणार आहे.

‘वल्र्ड वाइड फं ड फॉर नेचर इंडिया’ आणि ‘कन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ यांनी एकत्रितरीत्या कार्यक्रमाची आखणी के ली आहे. भारतात दरवर्षी ९.४६ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यापैकी के वळ ४० टक्के  कचऱ्याचे संकलन के ले जाते. निर्माण होणाऱ्या एकू ण कचऱ्यापैकी अर्धा कचरा उद्योग क्षेत्रातील प्लास्टिक वेष्टणांचा असतो. त्यातील बहुतांश प्लास्टिक एकदाच वापरता येण्याजोगे असते.

कोणत्या उत्पादनांना अनावश्यक प्लास्टिक वेष्टणे लावली जातात याची माहिती घेतली जाईल. अशा प्रकारची वेष्टणे बाद करून त्याऐवजी वेगळ्या पदार्थापासून तयार झालेली वेष्टणे वापरण्यास प्रोत्साहन दिले जाईल किं वा वेष्टणाची रचना बदलली जाईल. १०० टक्के  प्लास्टिक वेष्टणे पुनर्वापर करण्यायोग्य बनवली जातील. ५० टक्के  प्लास्टिक वेष्टणांवर पुनप्र्रक्रिया के ली जाईल.

या उपक्रमात आतापर्यंत  २७ कं पन्या सहभागी झाल्या आहेत. यात हिंदुस्थान युनिलिव्हर, अ‍ॅमेझॉन, कोकाकोला अशा नामवंत कं पन्यांचा समावेश आहे. सहभागी कं पन्यांना प्लास्टिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन के ले जाणार आहे