महिला अत्याचारावरून सेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

बोरिवलीतील प्रकरण समोर आल्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला अत्याचारावरून भाजपवर टीका करत बोरिवलीला धाव घेतली.

BJP-SHIVSENA1

बोरिवलीतील भाजप महिला कार्यकर्ता विनयभंग प्रकरण

मुंबई : भाजपच्या नगरसेवक पक्ष कार्यालयात विनयभंग के ल्याची तक्रार बोरिवलीतील एका महिला कार्यकत्र्याने के ल्यानंतर त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये राजकारण सुरू झाले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी बोरिवलीला धाव घेत मी असते तर थोबाड फोडले असते अशी टीका भाजपच्या स्थानिक नेत्यांवर के ली. तर शिवसेनेच्या एका नगरसेविके ने विनोद घोसाळकर यांच्यावर आरोप के ले तेव्हा थोबाड फोडावेसे वाटले नव्हते का, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत करत शिवसेनेवर प्रतिहल्ला चढवला.

बोरिवलीतील प्रकरण समोर आल्यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला अत्याचारावरून भाजपवर टीका करत बोरिवलीला धाव घेतली. बोरिवलीत पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यानंतर पेडणेकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पोलिसांनी त्यांचे काम के ले आहे. फिर्यादीने सांगितलेली सर्व माहिती नोंदवली आहे. कोर्टात त्यांनी तपासाबाबत मागणी केली आहे. आरोपी आणि तक्रारदार यांचा सगळ्यांचा अहवाल तयार के ला आहे. पोलिसांनी कामात कसूर के लेला नाही. पीडिता एक वर्ष का थांबली, या पोलिसांच्या प्रश्नावर एक वर्ष आमदार-खासदारांकडे दाद मागत असल्याचे पीडितेने म्हटले आहे. खासदारांनी तर नगरसेवकाकडे जा, असे  लेखी लिहून दिले. या घटनेचे राजकारण करू नये. महिला आपल्याकडे न्याय मागायला येते तेव्हा तिला पोलीस ठाण्यात घेऊन जावे. मुंबईचे पोलीस तत्परतेने काम करतात. कायदा, पोलीस, सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी महत्त्वाच्या असतात. महिलेवर अत्याचार होतात तर आपण न्यायासाठी उभे राहिले पाहिजे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत किशोरी पेडणेकर यांना उत्तर देत शिवसेनेवर प्रतिहल्ला चढवला. अंजली खेडेकर यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात घटनाक्रमाची माहिती दिली तसेच ही महिला पोलीस आणि वकिलांच्या धमक्या देत असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती चित्रा वाघ यांनी दिली. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि भाजपचा कार्यकर्ता दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. मात्र पोलीस वर्षभर तक्रार का दाखल करून घेत नव्हते, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मी असते तर थोबाड फोडले असते. पण मला महापौरांना विचारायचे आहे की, तुमच्याच पक्षाच्या सहकारी नगरसेविके ने विनोद घोसाळकर यांच्यावर आरोप के ले होते त्या वेळी तुम्हाला थोबाड फोडावेसे वाटले नाही, असा सवाल करत हे तुम्हाला शोभत नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Allegations against sena bjp over atrocities against women akp

फोटो गॅलरी