मुंबई : कोणाला ‘बॅट’ तर कोणाला ‘गॅस सिलिंडर’ आणि कोणाला ‘रिक्षा’ तर कोणाला ‘माईक’. ही आहेत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उभ्या राहिलेल्या विविध उमेदवारांना दिलेली मतदान चिन्हे! यात वर्सोवा मतदार संघात ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राजू पेडणेकर यांना रिक्षा तर शिवडीतील भाजपचे बंडखोर उमेदवार नाना आंबोले यांना ‘बॅट’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन गट अनेक ठिकाणी आमनेसामने आहेत. शिंदे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ आणि ठाकरे शिवसेनेची ‘मशाल’ अशी लढाई काही ठिकाणी होणार आहे. त्यातच मनसेनेही उमेदवार उभे केले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मिळून ३६ मतदारसंघासाठी ४२० उमेदवार उभे आहेत. त्यात शहर भागातील १० मतदार संघांसाठी १०५ उमेदवार तर पूर्व आणि पश्चिम उपनगरातील २६ मतदारसंघांत ३१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Abu Azmi visits Shivsena Shakha
Abu Azmi : अबू आझमींचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जंगी स्वागत, शाखेत बसून नागरिकांशी संवाद; शिवसैनिक प्रचार करणार
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
BJP MLA Parag Shah is Maharashtra's Wealthiest Candidate from Ghatkopar East Constituency
‘५०० कोटींवरून पाच वर्षात थेट ३३०० कोटी’, सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या संपत्तीचा तपशील वाचून डोळे गरगरतील
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

हेही वाचा >>>Uddhav Thackeray : “मोदींच्या अशुभ हातांनी उभा केलेला शिवरायांचा पुतळा…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई आहे. यामध्ये धनुष्यबाण, मशाल, कमळ, हात, रेल्वे इंजिन ही प्रमुख पक्षांची चिन्हे आहेत. मात्र बहुजन समाज पक्षाचे ‘हत्ती’ हे चिन्हही आहे. तर वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस’ सिलिंडर हे चिन्ह देण्यात आले आहे.

अपक्षांना दिलेली चिन्हे

निवडणूक चिन्हांमध्ये वातानुकूलित यंत्र (एसी), विजेचा खांब, हंडी, बॅटरी टॉर्च, शिट्टी, दूरदर्शन संच, चालण्याची काठी, रिक्षा, बासरी, काचेचा ग्लास, किटली अशा वस्तूंचाही समावेश आहे.

Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?

चिन्ह पोहोचवण्याचे आव्हान

वर्सोवा मतदारसंघात राजू पेडणेकर यांना ‘रिक्षा’ तर शिवडीतील नाना आंबोले यांना बॅट हे चिन्ह दिले आहे. हे बंडखोर उमेदवार अपक्ष उभे राहिल्यामुळे या दोघांना पक्षाचे पाठबळ मिळणार नाही. त्यामुळे हे चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही राजूल पटेल यांनी ‘रिक्षा’ या निवडणूक चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ३२ हजार मते मिळवली होती.

Story img Loader