Mumbai Ambedkar Jayanti Traffic Restriction : ‘भारतरत्न’ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त हजारो अनुयायी आजपासूनच डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. यामुळे चैत्यभूमी व आसपासच्या परिसरात आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतुकीतील गैरसोय टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. या संदर्भात त्यांनी अधिकृत पत्रक जाहीर केले आहे. आजपासून दुपारी ११ वाजल्यापासून ते उद्या रात्री १२ वाजेपर्यंत दादर चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर परिसराकडे जाणाऱ्या सर्व वाहतुकीमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. हे बदल नेमके काय आहेत आणि पर्यायी मार्ग कोणते असणार आहेत जाणून घेऊ…

एकेरी वाहतुकीसाठी खुले रस्ते व वाहतुकीसाठी बंद रस्ते ( traffic advisory for ambedkar jayanti)

१) एस. के. बोले रोडवर सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीज चर्चपर्यंत एकेरी वाहतूक सुरू राहील, म्हणजे पोर्तुगीज चर्चपासून एस.के. बोले रोडवर सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने प्रवेश बंद राहील.

solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
dr ambedkar jayant violence marathi news
डॉ. आंबेडकर जयंती साजरी करून अक्कलकोटजवळ वाद; दलित-सवर्ण संघर्ष
Traffic changes in Collectorate area on the occasion of Dr Ambedkar Jayanti
पुणे : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग
dr babasaheb ambedkar jayanti, 14 april, Mumbai Railways, Conduct Daytime Megablock, Central and Western Lines, Expect Disruptions, travelers, central railway, western railway, mumbai local, 14 april megablock, babasaheb ambedkar jayanti megablock, marathi news, railway news, mumbai local news
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी रेल्वे मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

२) स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून येस बँकपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. तथापि स्थानिक रहिवाशांची वाहने शिवाजी पार्क रोड नं.५ म्हणजे पांडुरंग नाईक मार्गाने जाऊ शकतील.

३) रानडे रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल.

४) ज्ञानेश्वर मंदिर रोड, एस.व्ही.रोड जंक्शनपासून दादर चौपाटीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

५) सर्व प्रकारची जड वाहने, मालवाहू वाहतुकीची वाहने (बेस्ट बसेस वगळता) माहीम जंक्शन येथून एल. जे. रोड मार्गे वळविली जातील.

वाहतूक कोंडी झाल्यास पर्यायी मार्गांबाबत मार्गदर्शक सूचना

१) दक्षिण वाहिनी पश्चिम द्रुतगती मार्गे, बांद्रामार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांनी

पर्यायी मार्ग

कलानगर जंक्शनकडे येथून डावे वळण घेऊन धारावी टी जंक्शन ते सायन रेल्वे स्थानक किंवा ६० फूट रोड, कुंभारवाडामार्गे सायन रुग्णालय येथे उजवे वळण घ्यावे. अन्यथा बांद्रा-वरळी सागरी उड्डाणपूल मार्गे (सी लिंक) दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करावे.

२) उत्तर वाहिनी महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शनकडून उत्तर वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांनी

पर्यायी मार्ग

पी.डीमेलो रोड, बॅरिस्टर नाथ पै रोड, झकेरिया बंदर रोड, आय. ए. के मार्ग यांचा वापर करून माटुंगा येथील अरोरा ब्रिजखाली उजवे वळण घेऊन सायन हॉस्पिटल जंक्शन मार्गे पुढे मार्गक्रमण करावे, अथवा बांद्रा-वरळी ,सागरी उड्डाणपूल मार्गे (सी लिंक ) उत्तर मुंबईकडे प्रस्थान करावे.

३) उत्तर वाहिनी महालक्ष्मी रेल्वे स्थानक जंक्शनकडून उत्तर वाहिनीवरून जाणाऱ्या वाहनांनी

पर्यायी मार्ग

डॉ. ई. मोजेस रोड, रखांगी चौक येथे उजवीकडे वळण घेऊन सेनापती बापट मार्गे पुढे मार्गक्रमण करावे.

४) पूर्व द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाने दक्षिणेकडे जाणारी वाहतूक

पर्यायी मार्ग

या वाहनांनी वडाळा ब्रिजचा वापर करून बरकत अली नाका, बी. पी. टी. कॉलनी, पूर्व द्रुतगती मार्गाचा वापर करावा.

हेही वाचा : …आणि भाजपवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे ते फलक काढण्याची वेळ

‘या’ रस्त्यांवर दोन्ही बाजूस नो- पोर्किंग

१) स्वातंत्रवीर सावरकर मार्ग सेन्च्युरी जंक्शन ते येस बँक जंक्शन
२) रानडे रोड
३) केळुसकर रोड, दक्षिण व उत्तर
४) ज्ञानेश्वर मंदिर रोड

वाहने पार्क करण्यास उपलब्ध रस्ते

१) संपूर्ण सेनापती बापट मार्ग, दादर
२) इंडिया बुल फायनांन्स सेंटर (PPL)
३) कोहिनूर स्क्वेअर कंपाऊंड, शिवाजी पार्क, दादर
४) कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग,
५) इंडिया बुल्स सेंटर, ज्युपीटर मिल कंपाऊंड, एलफिस्टन (PPL)
६) पाच गार्डन, आर.ए.के. ४ रोड