मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर तयार होणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वाना प्रेरणा देणारे ठरेल, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल बैस, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जाऊन त्यांना अभिवादन केले. या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.

अभिवादन कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विविध पैलू असलेले व्यक्तिमत्त्व होते. वंचित आणि उपेक्षित समाज बांधवांच्या न्याय्य हक्कासाठी ते अहोरात्र लढले. मुंबई शहर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. त्यांचे प्रेरणादायी कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी मुंबई दर्शनच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘टुरिझम सर्किट’साठी बस सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शासन या माध्यमातून उपक्रम राबवत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. समता, बंधुता व न्याय ही तत्त्वे समाजामध्ये रुजविण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या शिकवणीवर आपण सर्वानी चालले पाहिजे.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ

बहुआयामी व्यक्तिमत्त्व : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी दाखविलेल्या मार्गामुळेच आज आपल्या देशाचे नाव जगात आघाडीवर आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना नव्याने सुरू करत आहोत. विविध महामंडळांच्या माध्यमातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते शिक्षण देत आहोत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची व्यवस्था करण्यात येत आहे. इंदू मिल येथील जागतिक दर्जाचे स्मारक लवकरच पूर्ण करणार असून.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात ‘आनंदाचा शिधा’ आपण वितरण करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. स्मारक वर्षभरात पूर्ण करण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे.

खरा विकासाचा मार्ग : उपमुख्यमंत्री

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी भारताला दिलेले संविधान ही अनमोल देणगी आहे. भारत वेगाने विकास करत आहे याचे सर्व श्रेय आपल्या संविधानाला जाते. संविधान हे जगात आपल्याला पुढे नेणारे ठरेल. त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण काम केले पाहिजे.

विधान भवनात अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळय़ास महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी महाराष्ट्र माजी सदस्य रामभाऊ गुंडीले, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सह सचिव विलास आठवले, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक व जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.