मुंबई : दादरच्या इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम मार्च २०२४ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्मारकाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) देण्यात आले. दरम्यान,

साडेचार वर्षांपूर्वी डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू झाले असून आतापर्यंत प्रकल्पाचे केवळ २४ टक्के काम पूर्ण झाले आहे. दादर येथील इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला. इंदू मिलमधील ४.८४ हेक्टर जागेवर स्मारक उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनानंतर तात्काळ कामास सुरूवात होणे गरजेचे होते. मात्र एमएमआरडीएने कंत्राटदार मे. शापुरजी पालनजी यांना कार्यादेश देण्यास विलंब केला. भूमिपूजनानंतर जवळपास अडीच-तीन वर्षांनी ९ फेब्रुवारी २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. करारानुसार काम सुरू झाल्यापासून ३६ महिन्यात म्हणजे ८ फेब्रुवारी २०२१ रोजी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम संथगतीने सुरू असल्याने २०२१ ची मुदत निघून गेली असून कंत्राटदाराला आता थेट मार्च २०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. दुसरीकडे प्रकल्पाच्या खर्चातही वाढ झाली आहे. या प्रकल्पाचा खर्च ७६३.०५ कोटी रुपयांवरून थेट १०८९.९५ कोटी रुपयांवर पोहचला.

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

प्रकल्पाची सध्यस्थिती

प्रकल्पाचे एकूण सरासरी

२४ टक्के काम पूर्ण

प्रवेशद्वार इमारत : ५५ टक्के काम पूर्ण

व्याख्यान वर्ग :  ५० टक्के काम पूर्ण

ग्रंथालय :   ५० टक्के काम पूर्ण

प्रेक्षागृह :   ३८ टक्के काम पूर्ण वाहनतळ :    ९० टक्के काम पूर्ण

स्मारक इमारत :    ११ टक्के काम पूर्ण

असे असणार स्मारक

  • ४५० फूट उंचीच्या डॉ. आंबेडकर यांच्या कांस्य धातूच्या पुतळय़ाचा स्मारकात समावेश
  • स्मारक इमारतीत चैत्यसभागृह, संग्रहालय, प्रदर्शन केंद्र, पुतळय़ाच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी वर्तुळाकार मार्ग इत्यादी.
  • प्रवेशद्वार इमारतीत माहिती केंद्र, तिकीटघर, समान कक्ष, स्वच्छता गृह, नियंत्रण कक्ष, उपहारगृह इत्यादी.
  • संशोधन केंद्र, विपश्यना केंद्र, ग्रंथालय, सभागृह (एक हजार आसन क्षमता), वाहनतळ इत्यादी.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, इंदू मिल, दादर ४.४८ हेक्टर जागेवर स्मारकाची उभारणी
  • ७६३.०५ कोटी रुपये प्रस्तावित खर्च वाढीव खर्च १०८९.९५ कोटी रुपये भूमीपूजन २०१५ कार्यादेश २०१८
  • ८ फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित प्रकल्पास २०२४ पर्यंत मुदतवाढ २०२४ मध्ये काम होणार पूर्ण