केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ( २३ सप्टेंबर ) सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शाह यांचं गणेश मूर्ती, शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.

मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे शाह यांचं औक्षण केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन हे उपस्थित होते.

गृहमंत्री शाह दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल झाले. नंतर ते वांद्रे येथे गेले. अमित शाह यांनी वांद्रे येथे भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती मंडळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अमित शाह यांनी कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. शाह दरवर्षी मुंबईत लालबाग राजाच्या दर्शनासाठी येत असतात.

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Story img Loader